For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूरच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करू नका; मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांना सुचना

06:14 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
मणिपूरच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करू नका  मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांना सुचना
Advertisement

मुख्यमंत्री विरेन सिंह यांची मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप न करण्याची सूचना मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांना केली आहे. शेजारी राज्य मणिपूरमध्ये जातीय संघर्षावर तोडगा काढण्यासाठी स्वत:चे समर्थन देऊ शकतात असे म्हणत विरेन सिंह यांनी मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी अन्य राज्याच्या अंतर्गत विषयांवर टिप्पणी करणे टाळावे असा सल्ला दिला आहे.

Advertisement

राज्य पोलिसांनी मोरेहमध्ये लोकांना त्रास देऊ नये अशी टिप्पणी मिझोरमचे नवे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी केली आहे. त्यांची ही टिप्पणी त्यांच्या घटनात्मक अधिकारांच्या कक्षेबाहेरील असल्याचे मला वाटते. हा मणिपूर सरकारचा अंतर्गत विषय असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. मोरेह एक सीमावर्ती शहर असून ते मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवर आहे.

आमच्या राज्यातील जातीय हिंसेविषयी आसामचे मुख्यमंत्री हेमंत शर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांनी हा मुद्दा निकालात काढणे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वत:चे समर्थन दर्शविले होते. त्रिपुरा, मेघालय आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी देखील मी चर्चा केली असून त्यांनी राज्यातील स्थिती पूर्ववत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला असल्याचे सिंह म्हणाले.

या राज्यांचा उल्लेख करत मी मणिपूर आणि मिझोरममध्ये कुठलेही भांडण नसल्याचे सांगू इच्छितो. मिझोरममध्ये मैतेई आणि मणिपूरमध्ये मिझो लोक आहेत. आसाम आणि त्रिपुरात देखील एक लाखाहून अधिक मैतेई लोक आहेत. ईशान्येत आम्ही सर्वजण एकत्र राहत असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.