महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देऊ नका कफ सिरप

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डीसीजीआयकडून पत्र जारी : क्लोरफेनिरामाइन मॅलेट अन् फिनाइलफ्राइनच्या कॉकटेलचे लेबलिंग करण्याचा निर्देश

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सर्दी तसेच खोकल्याकरता कफ सिरपच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच औषधांना लेबल करण्याचा आदेश दिला आहे.  काही देशांमध्ये भारतात निर्मित कफ सिरपच्या वापरानंतर अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आल्यावर डीसीजीआयने हा निर्णय घेतला आहे. डीसीजीआयने 18 डिसेंबर रोजी फिक्स्ड ड्रग्स कॉम्बिनेशन (एफडीसी)वरून सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. यात दोन औषधे क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलफ्राइनच्या कॉकटेलचा (मिश्रण) वापर करत तयार करण्यात आलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर याचनुसार लेबलिंग करण्यास सांगण्यात आले आहे. पत्रात कंपन्यांना स्वत:च्या उत्पादनांवर ‘एफडीसीचा वापर 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये केला जाऊ नये’ असे नमूद करण्याचा आदेश दिला आहे.

या औषधांच्या मिश्रणाद्वारे तयार करण्यात आलेले सिरप किंवा गोळ्यांचा वापर सामान्य सर्दीच्या लक्षणांच्या उपचारासठी केला जातो. जागतिक आरोग्य संघटना देखील 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये खोकला आणि सर्दीच्या लक्षणांवरील उपचारासाठी ओव्हर-द-काउंटर कफ सिरप किंवा औषधांचा वापर करण्यास मनाई करते. 2022 मध्ये मेडन फार्माच्या 4 सिरपमुळे कथित स्वरुपात 70 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप होता. यात 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा देखील मृत्यू झाला होता. सर्व मृत्यूंमागे किडनी इंजरी कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले होते. गांबिया सरकारच्या चौकशीत भारतीय कंपनीकडून निर्मित औषधामुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. भारतात निर्मित कफ सिरप देण्यात आल्याने 18 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप उझ्बेकिस्तान सरकारने केला होता. उझ्बेक आरोग्य मंत्रालयाने नोएडाच्या मेरियन बायोटेकमध्ये निर्मित कफ सिरप डीओके-1 मॅक्स देण्यात आल्याने मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article