For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वेत चढू नका, जीवाला धोका

06:11 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेत चढू नका  जीवाला धोका
Advertisement

इस्रायलचा इराणच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 8 वाजताच्या धमकीदरम्यान इस्रायलच्या सैन्याने इराणच्या नागरिकांना सतर्क करत कमीतकमी 12 तास रेल्वेतून प्रवास करू नका असे सांगितले आहे. पर्शियन भाषेत जारी संदेशात इस्रायलने स्थानिक प्रमाणवेळेनुसार कमीतकमी रात्री 9 वाजेपर्यंत रेल्वेप्रवास करणे टाळा अशी सूचना केली आहे. यातून इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये नवी ठिकाणं लक्ष्य ठरू शकतात असे संकेत मिळत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत हा इशारा देण्यात आला आहे.

तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही इराणच्या प्रमाणवेळेनुसार आतापासून 9 वाजेपर्यंत (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11 वाजेपर्यंत) पूर्ण इराणमध्ये रेल्वे प्रवास न करण्याची विनंती करत आहोत. रेल्वे अन् रेल्वेमार्गांनजीक तुमची उपस्थिती तुमचा जीव धोक्यात आणेल असे इस्रायलने मंगळवारी एक्सवर पर्शियन भाषेत पोस्ट करत इशारा दिला आहे.

Advertisement

रेल्वेजाळे ‘हायरिस्क झोन’

इराणमध्ये रेल्वेजाळ्याला हाय रिस्क झोन घोषित करण्यात आले आहे. ही इशारा स्थिती गंभीर स्वरुपाचा संकेत आहे, कारण आता या संघर्षादरम्यान रेल्वे प्रणालींना संभाव्य धोकायुक्त क्षेत्राच्या रुपात ओळखण्यात आले आहे. काही वेळासाठी रेल्वेप्रवासापासून दूर रहा असे आवाहन अधिकाऱ्यांनी लोकांना केले आहे. संघर्षाची व्याप्ती वाढण्यासोबत अनेक क्षेत्रांमध्ये टार्गेटेड हल्ले होण्याची शक्यता असल्याने परिवहनाच्या सुविधांवर याचा प्रभाव पडू शकतो अशी चिंता अधिकाऱ्यांना आहे.

इराणमध्ये बंद आहे इंटरनेट

तुमची उपस्थिती तुमच्या जीवनाला धोक्यात आणू शकते असे या पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. इराणमध्ये अनेक आठवड्यांपासून इंटरनेट सेवा बंद असल्याने सामान्य इराणी नागरिक हा इशारा पाहू शकतील का असा प्रश्न निर्माण होतो.

Advertisement
Tags :

.