For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्लूटूथ इयरफोन्समुळे खरोखरच कॅन्सर होतो का? अमेरिकन न्युरोसर्जननी मांडले सत्य!

04:31 PM Mar 26, 2026 IST | NEETA POTDAR
ब्लूटूथ इयरफोन्समुळे खरोखरच कॅन्सर होतो का  अमेरिकन न्युरोसर्जननी मांडले सत्य
Advertisement

ब्लूटूथ इयरफोन्स हा आपल्या जच्या धावपळीच्या युगात आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. प्रवासात असो वा कार्यालयात, हे उपकरण सतत आपल्या कानाशी जोडलेले असते. मात्र, याच वाढत्या वापरासोबत रेडिएशन आणि मेंदूच्या कर्करोगाच्या (ट्यूमर) जोखमीबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. या विषयातील सखोल सत्य जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. रूपा जुथानी यांनी वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे काही महत्त्वपूर्ण तथ्ये मांडली आहेत.

Advertisement

डॉ. जुधानी यांच्या मते, ब्लूटूथ हेडफोन्समुळे मेंदूचा कर्करोग होतो ही केवळ एक भीती असून याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. सन २०२२ मध्ये अद्ययावत केलेल्या एका व्यापक संशोधनात, सुमारे दहा लाख महिलांच्या १४ वर्षांच्या डेटाचा अभ्यास करण्यात आला. या प्रदीर्घ संशोधनानंतर ब्लूटूथचा वापर आणि मेंदूचा कर्करोग यांचा कोणताही परस्पर संबंध आढळून आलेला नाही. त्यामुळे सामान्यवापरासाठी ही उपकरणे सुरक्षित मानली जातात.

रेडिएशनच्या स्वरूपाबद्दल स्पष्टीकरण देताना त्या सांगतात की, ब्लूटूथ उपकरण यांमधून उत्सर्जित होणारे रेडिएशन हे 'नॉन आयोनाइजिंग' प्रकारचे असते. क्ष-किरण (एक्स-रे) सारख्या घातक किरणांच्या उलट, हे सौम्य रेडिएशन आपल्या शरीरातीलपेशींच्या 'डीएनए'ला कोणतीही इजा पोहोचवत नाही. पेशींमधील 'डीएनए'ची हानी न झाल्यामुळे कर्करोगाची गाठ निर्माण होण्याची शक्यता उरत नाही.

Advertisement

एक महत्त्वाची बाब म्हणजे, आपण जेव्हा मोबाईल फोन थेट कानाला लावून बोलतो, तेव्हा रेडिएशनचा धोका अधिक असतो. फोन चार्ज होत असताना किंवा कॉल जोडला जात असताना त्यातून सर्वाधिक लहरी बाहेर पडतात. अशा वेळी फोन डोक्यापासून काही अंतरावर ठेवणे हिताचे ठरते. त्यामुळे थेट फोन कानाला लावण्यापेक्षा इयरफोन्स वापरणे हा अधिक सुरक्षित पर्याय ठरतो.

श्रवणशक्तीच्या सुरक्षेसाठी फोन 'स्पीकर'वर ठेवून बोलणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी हे शक्य नसल्यास हेडफोन्सचा वापर करावा. संशोधनानुसार, फोन थेट कानाला लावल्याने श्रवणनसांवर (हियरिंग नर्व्ह) जे परिणाम होतात, ते हेडफोन्स वापरल्यास टाळता येतात. कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित आणि आवश्यकतेनुसार करणे हेच उत्तम आरोग्याचे सूत्र आहे.

Advertisement
Tags :

.