कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्ञानप्रबोधन मंदिर, केएलई स्कूल विजयी

10:31 AM Feb 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हनुमान चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : बेळगाव क्रिकेट क्लब आयोजित हनुमान चषक 14 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून केएलईने लव्हडेलचा 6 गड्यांनी तर ज्ञानप्रबोधनने ठळकवाडीचा 59 धावांनी पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला. साईराज पोरवाल व मंथन शर्मा यांना ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. एसकेई प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात लव्हडेल संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 124 धावा केल्या. त्यात अजय लमाणीने 9 चौकारांसह 55, साद बेलवाडे व देमनगौडा यांनी प्रत्येकी 13 तर अंशने 12 धावा केल्या. केएलईतर्फे साईराज पोरवालने 23 धावांत 3, कौस्तुभ व अतिथी भोगणने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलईने 19.2 षटकात 4 गडी बाद 125 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला.

Advertisement

त्यात साईराज पोरवालने 5 चौकारांसह 54, स्वयम खोतने 3 चौकारांसह 19, ओजस गडकरीने 14 तर कौस्तुभ पाटीलने 13 धावा केल्या. लव्हडेलतर्फे अथर्व चतुरने 2 तर अंशने 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात ज्ञानप्रबोधनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 149 धावा केल्या. त्यात मंथन शर्माने 9 चौकारांसह 82, आयुष आजगावकरने 4 चौकारांसह 29 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे ज्ञानेश्वर मोरेने 10 धावांत 3, अभिषेक प्रसादने 25 धावांत 2 तर श्रेयसने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ठळकवाडी संघाचा 17 षटकात 90 धावांत आटोपला. त्यात पुनीत मेत्रीने 3 चौकारांसह 21, ज्ञानेश्वर मोरेने 14 तर श्रेयश नाईकने 13 धावा केल्या. ज्ञानप्रबोधनतर्फे ऋषिकेश गुरव, श्रेयश तिळवे, सर्वेश तिळवे यांनी प्रत्येकी 2 तर अद्वैत व अवनिश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

शनिवारचे सामने

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article