For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगड शासनातर्फे ज्ञानेश्वरी यादवचा गौरव

07:13 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगड शासनातर्फे ज्ञानेश्वरी यादवचा गौरव
Advertisement

वृत्तसंस्था, रायपूर

Advertisement

नुकत्याच झालेल्या 2026 च्या ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देणारी महिला वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवचा छत्तीसगड शासनातर्फे खास गौरव करण्यात आला.

सोमवारी आयोजित केलेल्या समारंभात राज्याचे मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी ज्ञानेश्वरी यादवला 30 लाख रुपयांचे बक्षीसाची घोषणा केली तसेच तिला पोलीस दलामध्ये बढती देण्याचा निर्णय घेतला. आता ती पोलीस दलात डीएसपी पदावर कार्यरत राहील.

Advertisement

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्ञानेश्वरी यादवने महिलांच्या 53 किलो वजन गटातील वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदक भारताला मिळवून दिले. ज्ञानेश्वरी यादवच्या कामगिरीचे संपूर्ण राज्यात कौतुक करण्यात आले. ज्ञानेश्वरीने पहिल्यांदाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग दर्शवून रौप्यपदक मिळविले आहे. छत्तीसगडच्या क्रीडा इतिहासामध्ये ज्ञानेश्वरीने रौप्यपदक मिळवून नवे सुवर्णपान उघडले आहे. ज्ञानेश्वरीने यापूर्वी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते.

Advertisement
Tags :

.