For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनगोळ येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

12:59 PM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनगोळ येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
Advertisement

आज श्री माऊलींची मिरवणूक

Advertisement

बेळगाव : अनगोळ येथील ज्ञानेश्वरी पारायण मंडळाच्यावतीने बुधवार दि. 4 ते रविवार दि. 8 पर्यंत पारायण सोहळा आयोजित केला आहे. मंगळवारी सकाळी 10 वा. ज्ञानेश्वरी माऊली प्रतिमेची मिरवणूक नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठमार्गे प्रमुख गल्ल्यांमधून विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे पोहचणार आहे. दि. 4 रोजी सकाळी 7 वा. संकल्प पूजा, गणेश पूजन, विठ्ठल रुक्मिणी पूजन, मारुती पूजन, अभिषेक, पोथी स्थापना, गुरु वासकर महाराज फोटो पूजन, वीणा, टाळ, मृदंग, पताका, तुळस पूजन करण्यात येणार आहे. पूजा, काकड आरती, सकाळी 8 ते 11 पारायण, दुपारी 12 ते 1.30 गाथा भजन, सायंकाळी 5.30 ते 6.30 प्रवचन, 6.30 ते 7 जय जय राम कृष्ण हरी नाम जप, रात्री 8 ते 10 कीर्तन,

गुरुवार ते शनिवार 5 ते 6.30 काकड आरती, नित्य पूजन, अभिषेक, 8 ते 10 पारायण, दुपारी 12 ते 1.30 गाथा भजन, सायंकाळी 5.30 ते 6.30 प्रवचन, 6.30 ते 7 जय जय राम कृष्ण हरी बिज मंत्राचा नामजप, गुऊवार, शुक्रवार व शनिवारी रात्री 8 ते 10 सांप्रदायिक कीर्तन सोहळा होणार आहे. रविवारी सकाळी काकड आरती, नित्य पूजन, पूजा, अभिषेक, सकाळी 7 ते 8 सामुदायिक पारायणाची सांगता, नामजप, ग्रंथ पूजन, पसायदान, आरती, सकाळी 8.30 ते 10.30 काला कीर्तन, सायंकाळी प्रवचन व नामजप होणार आहे. रविवारी सकाळी 10.30 ते 12.30 श्रींची पालखी मिरवणूक, दिंडी सोहळा, नगर प्रदक्षिणा, महामंगळारती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.  भक्तांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

राजहंस गल्ली मंडळाच्यावतीने प्रसादाचे आयोजन

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पारायण सोहळ्याची मिरवणूक राजहंस गल्ली येथे आल्यानंतर श्रीराम युवक मंडळाच्यावतीने सदानंद महाराज मठ येथे दुपारी प्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Advertisement
Tags :

.