ज्ञान प्रबोधन मंदिरने सर्वसाधारण अजिंक्यपद पटकाविले
जैन हेरिटेज हायस्कूलतर्फे आंतरशालेय ‘इनफिनिटम व्योमा महोत्सव
बेळगाव : तरुण भारत ट्रस्टच्या ज्ञान प्रबोधन मंदिर आय.एस.ई.च्या विद्यार्थ्यांनी जैन हेरिटेज हायस्कूल आयोजित आंतरशालेय ‘इनफिनिटम व्योमा महोत्सवात’ प्राथमिक व माध्यमिक विभागात उज्ज्वल यश मिळवून सर्वसाधारण अजिंक्यपद पटकाविले. प्राथमिक विभागामध्ये वेशभूषा स्पर्धेत अनघा वाटवे, स्वरा पाटील, रिषभ लोकरी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पपेट शोमध्ये शॉन सुंठणकर तृतीय क्रमांक तर पिक अँड स्पीक स्पर्धेत सिद्धार्थ एम. के. याने तृतीय क्रमांक मिळविला. माध्यमिक विभागात स्टँड अप कॉमेडीमध्ये आयुष अणवेकर याने प्रथम, शार्क टँकमध्ये अंशुमन डागा, नैविका भोजवानी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मिस व्योम स्पर्धेमध्ये गाथा जैन हिने प्रथम क्रमांक मिळविला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत साईश पाटील व अथर्व डोंगरे यांनी द्वितीय क्रमांक, कॅनवास पेंटिंग स्पर्धेत श्रेय अचमनी याने तृतीय,मॉक पार्लमेंटमध्ये आदिनारायण प्रभूखोत व अर्थव पवार यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सामूहिक नृत्य स्पर्धेत पावणी भोजवानी, साची भडाळे, तिर्था पाटील, मेधा वेर्णेकर, अर्पिता दिवटे, वेदांत कुंभार यांना तृतीय क्रमांक मिळाला. शाळेचे प्रशासक गोविंद वेलिंग, प्राचार्या मंजिरी रानडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. स्पर्धेसाठी रिबेका सेराफिम, सिद्धाली पाटील, शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.