महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

द्रमुक मंत्र्याला 3 वर्षांची शिक्षा

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पत्नीलाही तुरुंगवास :  प्रत्येकी 50 लाख दंड

Advertisement

वृत्तसंस्था /चेन्नई

Advertisement

मद्रास उच्च न्यायालयाने बेहिशेबी संपत्ती जमविल्याप्रकरणी तामिळनाडूचे उच्चशिक्षणमंत्री के. पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला प्रत्येकी 50 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पोनमुडी यांच्याकडे उच्चशिक्षण विभागाचा प्रभार असल्याने न्यायालयाने शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित केली आहे. पोनमुडी यांना यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते, परंतु आता हा निर्णय उच्च न्यायालयाने पालटविला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती न दिल्यास पोनमुडी यांना विधानसभा सदस्यत्व आणि मंत्रिपद गमवावे लागणार आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय तामिळनाडूतील द्रमुक सरकारला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने पोनमुडी आणि त्यांच्या पत्नी पी. विशालाक्षी यांना बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी निर्दोष ठरविणारा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला होता. दक्षता तसेच भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाकडून दाखल याचिकेवर आदेश देत न्यायाधीश जी. जयचंद्रन यांनी पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला दोषी ठरविले होते. न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींच्य विरोधात सादर करण्यात आलेल्या ठोस पुराव्यांचा उल्लेख केला आहे. तसेच पुराव्यांकडे डोळेझाक करत आरोपींची निर्दोष मुक्त करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयाकडून देण्यात आलेल्या अपुऱ्या कारणांची दखल घेतली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article