For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द्रमुक नेत्याच्या पुत्राने कारने लोकांना चिरडले

06:37 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
द्रमुक नेत्याच्या पुत्राने कारने लोकांना चिरडले
Advertisement

किरकोळ वादातून घडला प्रकार

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूत द्रमुक नेत्याच्या 20 वर्षीय पुत्राने स्वत:च्या कारने चार लोकांना चिरडले असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी द्रमुक नेत्याचा पुत्र आदित्य याला अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी आदित्य याच्यासह त्याचा मित्र रितिक कुमार आणि हरीश यांनाही अटक केली आहे. हे आरोपी घटनेवेळी आदित्यसोबत कारमध्ये होते.

Advertisement

सहाय्य कामगार निरीक्षक शिवमूर्ती यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. हत्येचा गुन्हा नोंदवून घेत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शिवमूर्ती यांची दुचाकी घराबाहेर पार्क होती, यावेळी आदित्य कार घेऊन तेथे आला आणि जोरजोरात हॉर्न वाजवू लागला. आम्ही दुचाकी हटविण्याचा प्रयत्न केल्यावर आदित्यने आमच्या दुचाकीला मागून धडक दिली. आदित्य आणि त्याचे मित्र मद्यधुंद अवस्थेत होते. आसपासच्या लोकांनी त्यांच्या वर्तनावर संताप व्यक्त केल्यावर आरोपींनी आम्हाला मारहाण सुरू केली. याचदरम्यान एका आरोपीने शिवमूर्ती यांना कारने चिरडल्याचे त्यांच्या पुत्राने सागितले आहे.

Advertisement
Tags :

.