द्रमुक नेत्याचे महिलांना उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य
वृत्तसंस्था/ चेन्नई
द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री के. पोनमुडी यांनी शैव आणि वैष्णवावरून केलेली टिप्पणी वादग्रस्त ठरली आहे. या वादारम्यान द्रमुकने त्यांना एका महत्त्वपूर्ण पदावरून हटविले आहे. या टिप्पणीवरील द्रमुक खासदार कनिमोझी यांच्यासह अनेकांनी टीका केली होती.
पोनमुडी यांना पक्ष उपमहासचिव पदावरून मुक्त केले जात असल्याचे द्रमुक अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सांगितले आहे. तर पोनमुडी यांना मंत्रिमंडळातून हाकलण्याची मागणी भाजपने केली आहे.
एका महिलेसंबंधी पोनमुडी यांनी केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह होते. या वादानंतर राज्याचे वनमंत्री असलेल्या पोनमुडी यांनी कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे. पोनमुडी यंच्या टिप्पणीमुळे तामिळनाडूच्या महिलांचा अवमान झाला असल्याची टीका भाजपने केली आहे. पोनमुडी यांची टिप्पणी स्वीकारार्ह नाही. त्यांनी वापरलेले शब्द अश्लील आणि निंदनीय आहेत असे कनिमोझी यांनी स्वत:च्या पक्षाच्या नेत्याला सुनावले आहे.