For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द्रमुक, अण्णाद्रमुक, भाजपकडून विजय लक्ष्य

06:03 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
द्रमुक  अण्णाद्रमुक  भाजपकडून विजय लक्ष्य
Advertisement

तामिळनाडूचे मुख्यमंत्री अडचणीत :

Advertisement

वृत्तसंस्था, चेन्नई

तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपति विजय आणि त्यांचा पक्ष तमिलगा वेट्री कडगम (टीव्हीके)च्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यातील तीन मोठे पक्ष द्रमुक, अण्णाद्रमुक आणि भाजपने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्याहंनी राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची वेगवेगळ्या वेळी भेट घेत सत्तारुढ पक्षावर आमदारांचा घोडेबाजार चालविल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री विजय यांच्यावर शासकीय यंत्रणेचा गैरवापर आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनधिकृत लोकांच्या उपस्थितीचाही आरोप करण्यात आला आहे. राज्यातील विजय सरकार यंत्रणेचा गैरवापर करत आमदारांच्या खरेदीविक्रीचा प्रयत्न करत आहे. याच्या विरोधात कारवाई व्हायला हवी. आम्ही राज्यपालांची भेट घेत राज्यात सुरू असलेल्या प्रकारांविषयी माहिती दील आहे. जॉन आणि विष्णू रे•ाr यांचा सरकारशी कुठलाच संबंध नसतानाही ते राज्याच्या मंत्र्यांपेक्षा अधिक प्रभावशाली ठरले आहेत. हे दोन्ही व्यक्ती सर्व उच्चस्तरीय बैठकांमध्ये सामील असतात आणि अधिकाऱ्यांना आदेश देत असल्याचा आरोप द्रमुक नेते आर.एस. भारती यांनी केला आहे.

Advertisement

आमदारांशी संपर्काचा आरोप

मुख्यमंत्री विजय यांनी वैयक्तिक स्वरुपात आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यापूर्वी एमडीएमकेचे नेत वायको यांनी केला होता. तर द्रमुकच्या दोन आमदारांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणे आणि टीक्हीकेन सामील होण्याची ऑफर विजय यांनी दिली होती असा दावा आहे. याप्रकरणी द्रमुकने थेट राज्यपालांकडे तक्रार केली आहे. विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यास पोटनिवडणुकीच्या दरम्यान टीव्हीकेची उमेदवारी आणि आर्थिक बळ पुरविण्याचे आश्वासन विजय यांनी आमदारांना दिल्याचा दावा आहे.

अण्णाद्रमुक, भाजपही सक्रीय

द्रमुक व्यतिरिक्त अण्णाद्रमुक आणि भाजपनेही राज्यपालांची भेट घेत राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. राज्यपालांनी घटनेचे अनुच्छेद 167 चा वापर करत सरकारकडून स्पष्टीकरण मागावे आणि वेळप्रसंगी पुढील कारवाई करावी असा आग्रह दोन्ही पक्षांनी केला आहे. जॉन अरोकियासामी आणि विष्णू रे•ाr हे प्रोटोकॉलचे उल्लंघन करत असल्याचाही आरोप आहे.

टीव्हीकेचे प्रत्युत्तर

तीन पक्षांकडून झालेल्या टीकेनंतर थलपति विजय यांच्या पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. घोडेबाजाराचा आरोप पूर्णपणे निराधार आहे. तर जॉन आणि विष्णू रे•ाr हे मंत्रिमंडळ बैठकीत सामील होत आहेत, या दोघंना मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार नियुक्त करण्यात आले आहे. याचमुळे ते आता शासकीय प्रणालीचा हिस्सा असल्याचे टीव्हीकेने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.