डीमार्टने कमविला 684 कोटीचा नफा
नवी दिल्ली :
डिमार्ट सुपर मार्केट चालविणाऱ्या एव्हेन्यु सुपरमार्टने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 684 कोटी रूपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या तुलनेमध्ये नफा 3.9 टक्के वाढला आहे. कंपनीने याचदरम्यान सदरच्या तिमाहीत 15 टक्के वाढीसोबत 16676 कोटी रूपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे.
कंपनीचे सीईओ अंशुल असावा यांनी सांगितले की, दोन वर्षांपेक्षा जुन्या असणाऱ्या डीमार्ट स्टोअर्समधील विक्रीचा आलेख उंचावलेला होता. सदरच्या स्टोअर्समध्ये 6.8 टक्के वाढलेली दिसून आली. सरकारने अलीकडेच विविध गरजेच्या वस्तुंवरील सेवाकरामध्ये (जीएसटी) कपात केली आहे. याचा लाभ डीमार्टला सर्वांधिक होताना पाहायला मिळतो आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीने 8 नवीन स्टोअर्स सुरू केली आहेत. यायोगे पाहता 30 सप्टेंबर अखेरपर्यंत कंपनीची एकूण स्टोअर्सची संख्या 432 झाली आहे. ग्राहकांना चांगल्यात चांगली सुविधा देण्यासाठी कंपनीचे प्रयत्न यापुढेही असतील. मेट्रो शहरांमध्ये कंपनी आपली उपस्थिती अधिक मजबूत करू पाहते आहे. त्यादृष्टीने कंपनी नव्याने योजना आखत असल्याचे समजते.