डीएलएफ करणार 20 हजार कोटीची गुंतवणूक
बेंगळूर :
बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनी डीएलएफ येणाऱ्या काळामध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी ही गुंतवणूक व्यावसायिक मालमत्तांचा विकास त्याचप्रमाणे कार्यालयीन गाळ्यांची उभारणीसाठी करणार असल्याचे समजते.
येणाऱ्या काळात प्रकल्पांच्या विकासासाठी डीएलएफ संयुक्त विद्यमाने डीएलएफ सायबरसिटी डेव्हलपर लिमिटेड यांच्यासोबत एकत्रित काम करणार आहे. आजतोवरच्या कंपनीच्या कामगिरीचा लेखाजोखा पाहिल्यास भाडेतत्त्वावरील इमारतींच्या बाबतीमध्ये जवळपास 44 दशलक्ष चौरस फूट इतकी जागा कंपनीकडे सध्याला आहे.
किती राबवले प्रकल्प
कंपनीने जवळपास 185 बांधकाम प्रकल्पांचा विकास केला असून यासाठी जवळपास 352 दशलक्ष चौरस फूट इतक्या जागेचा वापर केला असल्याचे सांगितले जात आहे. रहिवासी आणि व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांच्या विकासासाठी आगामी काळामध्ये 220 दशलक्ष चौरस फूट इतकी जागा कंपनीच्या ताफ्यात असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.