For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोकोविच, व्हेरेव, स्वायटेक, अँड्रिव्हाची विजयी सलामी

06:20 AM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
जोकोविच  व्हेरेव  स्वायटेक  अँड्रिव्हाची विजयी सलामी
Advertisement

टेलर फ्रित्झला निशेष बसवरेड्डीचा धक्का, जोन्स, पेरीकार्ड, बाँझी यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था, पॅरिस

2026 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविच तसेच जर्मनीचा अॅलेक्झांडर व्हेरेव, जपानचा नाकाशिमा, इटलीचा मॅटो बेरेटेनी यांनी पुरूष विभागात तर पोलंडची इगा स्वायटेक, कझाकस्तानची रायबाकिना, अमेरिकेची पाओलिनी आणि एलिस मर्टन्स यांनी महिलांच्या एकेरीत विजयी सलामी दिली. अमेरिकेचा सातवा मानांकीत टेलर फ्रित्झचे आव्हान पहिल्याच फेरीत अमेरिकेच्याच निशेष बसवरे•ाrने संपुष्टात आणले.

Advertisement

पुरूष एकेरीच्या पहिल्याच फेरीतील सामन्यात सर्बियाच्या जोकोविचने फ्रान्सच्या मिपेत्शी पेरीकार्डचा 5-7, 7-5, 6-1, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत आपल्या विक्रमी 25 व्या ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला. जोकोविचने ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळण्याचा नवा विक्रम करताना स्वीसच्या रॉजर फेडररचा विक्रम मागे टाकला. ग्रँडस्लॅम स्पर्धेतील जोकोविचचा हा 82 वा सामना आहे. जोकोविचला सलामीच्या सामन्यात पहिला सेट गमवावा लागला होता. पण त्यानंतर त्याने तीन सेट्स जिंकून पेरीकार्डचे आव्हान संपुष्टात आणले.

पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेवने फ्रान्सच्या बेंजामीन बाँझीचा 6-3, 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. या स्पर्धेत व्हेरेव डार्क हॉर्स म्हणून ओळखला जातो. व्हेरेवने 2024 साली या स्पर्धेत उपविजेतेपद तर तीनवेळा त्याने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच तापमान 30 डिग्री सेल्सीयस असल्याने टेनिसपटूंची दमछाक झाली.

बसवरेड्डीचा फ्रित्झला धक्का

अमेरिकेचा सातवा मानांकीत टेलर फ्रित्झला पहिल्याच फेरीत त्याच्याच देशाच्या नवोदित निशेष बसवरे•ाrकडून पराभवाला सामोरे जावे लागले. निशेषने फ्रित्झचा 7-6 (7-5), 7-6 (7-5), 6-7 (7-9), 6-1 अशा सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत अमेरिकेच्या 21 वर्षीय बसवरेड्डीने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळविला होता. टेलर फ्रित्झ आणि निशेष यांच्यातील ही लढत चार सेट्समध्ये रंगली. हा सामना तब्बल अडीच तास चालला होता.

पुरूष एकेरीच्या अन्य एका सामन्यात जपानच्या नाकाशिमाने रॉबर्टो बॉटिस्टा अॅग्युटचा 6-2, 7-5, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. अन्य एका सामन्यात मिचेलसनने शेवचेंकोचा 6-2, 6-4, 6-2, ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरने सॅम्युअलचे आव्हान 6-4, 6-4, 6-2 असे संपुष्टात आणत विजयी सलामी दिली. इटलीच्या अनुभवी आणि वयस्कर बेरेटेनीने विजयी सलामी देताना एम. फुक्सोविचचा 6-7 (2-7), 7-5, 6-1,  6-2 असा पराभव केला.

महिलांच्या विभागात रशियाच्या 19 वर्षीय मायरा अँड्रिव्हाने विजयी सलामी देताना फ्रान्सच्या फेरोचा 6-3, 6-3 अशा फडशा पाडला. हा सामना तासभर चालला होता. दुसऱ्या एका सामन्यात मार्टा कोस्ट्युकने विजयी सलामी देताना ओकसेना सिलेखमेटेव्हावर 6-2, 6-3 अशी मात केली. इलिना रायबाकिनाने या स्पर्धेच्या मोहिमेला विजयाने प्रारंभ करताना पहिल्या फेरीतील सामन्यात इरेजेव्हीकचा 6-2, 6-2 असा फडशा पाडला. पोलंडच्या इगा स्वायटेकने जोन्सवर 6-1, 6-2 अशी मात करत विजयी सलामी दिली. जस्मिन पाओलिनीने यास्ट्रीमेस्काचा 7-5, 6-3 असा फडशा पाडत दुसरी फेरी गाठली. एलिस मर्टन्सने मारियाचे आव्हान 7-5, 6-0 असे संपुष्टात आणत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.

Advertisement
Tags :

.