For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोकोव्हिच, स्वायटेक उपांत्यपूर्व फेरीत

06:22 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
जोकोव्हिच  स्वायटेक उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिस या क्रीडा प्रकारात सर्बियाच्या जोकोव्हिचने तसेच महिलांच्या विभागात पोलंडची स्वायटेक यांनी शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. दरम्यान अमेरिकेच्या टॉपसिडेड गॉफचे आव्हान संपुष्टात आले. स्पेनच्या नदाल व अल्कारेझ तसेच अँडीमरे व इव्हॉन्स यांनी दुहेरीतील दुसऱ्या फेरीतील सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

पुरूष एकेरीच्या बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सर्बियाचा जोकोव्हिचने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना जर्मनीच्या कोफेरचा 7-5, 6-3 असा पराभव केला. मंगळवारी येथे उष्णतेचे तापमान वाढल्याने खेळाडूंची दमछाक झाल्याचे जाणवले. ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरूष एकेरीतील विद्यमान विजेता जर्मनीचा व्हेरेव्हने तिसऱ्या फेरीतील सामन्यात झेकच्या मॅकहेकचा 6-3, 7-5 असा पराभव केला. 38 वर्षीय नदाल आणि 21 वर्षीय अल्कारेझ या स्पेनच्या टेनिसपटूंनी आतापर्यंत 26 ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेतील एकेरीची अजिंक्यपदे मिळविली आहेत. जर्मनीच्या व्हेरेव्हने झेकच्या मॅकहेकचा 6-3, 7-5, असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या टेलर फ्रीजने ब्रिटनच्या ड्रेपरचा 6-7(3-7), 6-3, 6-2, टॉमी पॉलने झेकच्या मेनसिकचा 6-3, 6-1, इटलीच्या मुसेटीने अर्जेंटिनाच्या नेव्हानोचा तसेच फेलिक्स ऑगेर अॅलिसीमेने तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविताना जर्मनीच्या मार्टरेरचा 6-0, 6-1 असा पराभव केला.

Advertisement

पुरूष दुहेरीच्या प्रकारात नदाल आणि अल्कारेझ यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरूष दुहेरीच्या सामन्यात नदाल आणि अल्कारेझ यांनी हॉलंडच्या ग्रिक स्पूर व कुलहॉप यांचा 6-4, 6-7 (2-7) आणि 10-2 असा पराभव केला. ब्रिटनच्या अँडी मरेने आपल्याच देशाच्या इव्हान्स समवेत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविताना बेल्जियमच्या गिले व व्हिलेगेन यांचा 6-3, 6-7 (8-11), 11-9 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. ब्रिटनच्या अँडी मरेने दुहेरीतील सामना जिंकल्याने त्याने आपल्या निवृत्तीच्या निर्णयामध्ये थोडा फेरबदल केला आहे. पुरूष दुहेरीच्या अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या राजीव रॅम आणि ऑस्टिन क्रेझीशेख यांनी ब्राझीलच्या मॉन्टेरो व वाईल्ड यांचा 6-4, 7-6 (7-3) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

महिलांच्या एकेरीमध्ये अमेरिकेच्या कोको गॉफचे एकेरितील आव्हान संपुष्टात आले आहे. अल्कारेझ प्रमाणे गॉफचे ऑलिम्पिकमध्ये हे पदार्पण आहे. क्रोएशीयाच्या डोना व्हेकिकने गॉफचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. स्लोव्हाकियाच्या स्किमेडलोव्हाने इटलीच्या मारिया सॅकेरीचा 7-5, 3-6, 7-5 असा पराभव केला. कॅनडाच्या लैला फर्नांडीझने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना चीनच्या झेंग क्वीनवेनचा 6-4, 6-3 असा पराभव केला.

Advertisement
Tags :

.