For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोकोविच, सिनेर उपांत्यपूर्व फेरीत

06:00 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
जोकोविच  सिनेर उपांत्यपूर्व फेरीत
Serbia's Novak Djokovic plays a forehand return to Italy's Lorenzo Musetti during their Monte Carlo ATP Masters Series Tournament round of 16 on the Rainier III court at the Monte Carlo Country Club on April 11, 2024. (AFP)
Advertisement

वृत्तसंस्था/ माँटेकार्लो

Advertisement

एटीपी टूरवरील येथ सुरू असलेल्या पुरुषांच्या माँटेकार्लो मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविच तसेच इटलीचा जेनिक सिनेर यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र डॅनिल मेदव्हेदेवचे आव्हान संपुष्टात आले आहे.

गेल्या वर्षी या स्पर्धेत मुसेटीकडून जोकोविचला पराभव पत्करावा लागला होता. पण यावेळी जोकोविचने मुसेटीचे आव्हान 7-5, 6-3 असे संपुष्टात आणत मागील पराभवाची परतफेड करताना शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम विजेत्या इटलीच्या जेनिक सिनेरने जेन स्ट्रफचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. जोकोविचचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरशी होणार आहे. कॅचेनोव्ह आणि सित्सिपस यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. सित्सिपसने जर्मनीच्या व्हेरेवचा 7-5, 7-6(7-3) त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या डी मिनॉरने ऑस्ट्रेलियाच्या पॉपिरीनचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Advertisement

Advertisement
Tags :

.