जोकोविच, शेल्टन पराभूत
वृत्तसंस्था, बेसिल (स्वीस)
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या बेसिल खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉप सिडेड जोकोविच तसेच अमेरिकेचा टॉप सिडेड बेन शेल्टन यांना पराभवाला सामोरे जावे लागले. स्वीसचा माजी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू रॉजर फेडररच्या देशात सदर स्पर्धा सुरु असून जोकोविचला फेडररचा विक्रम मात्र गाठता आला नाही. फेडररने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत एटीपी टूरवरील 103 अजिंक्यपदे मिळवली आहेत. जोकोविचला फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याकरीता आणखी एक स्पर्धा जिंकावी लागेल.
बेसिल स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या सामन्यात 47 व्या मानांकित स्ट्रफने जोकोविचचा 6-7 (4-7), 7-5, 7-6 (7-5) असा पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात स्वीसच्या वाईल्डकार्डधारक जेरोमी किमने अमेरिकेच्या बेन शेल्टनचा 6-3, 6-7 (4-7), 7-6 (7-1) असा पराभव करत पुढील फेरी गाठली. झेकच्या लिहेकाने डॅनियल अल्टमेयरचा 7-5, 6-4, द्वितीय मानांकित आर्थर फिल्सने अॅलेक्स मिचेलसनचा 4-6, 6-3, 7-6 (7-5), अमेरिकेच्या टेलर फ्रित्झने कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
