For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोकोविच, गॉफ, व्हेरेव्ह विजयी, रुबलेव्ह, अझारेंका पराभूत

06:27 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
जोकोविच  गॉफ  व्हेरेव्ह विजयी  रुबलेव्ह  अझारेंका पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

2024 च्या टेनिस हंगामातील फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविच, जर्मनीचा अॅलेक्झांडर व्हेरेव्ह तसेच महिलांच्या विभागात अमेरिकेची कोको गॉफ, अँड्रीव्हा, बॉग्डेन यांनी शानदार विजय नोंदवित पुढील फेरी गाठली. मात्र रशियाचा रुबलेव्ह तसेच बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका यांचे आव्हान संपुष्टात आले. जपानच्या निशिकोरीला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

Advertisement

पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात सर्बियाच्या जोकोविचने रॉबर्टो कार्बालीस बाएनाचा 6-4, 6-1, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला. सदर सामना गुरुवारी पावसामुळे अर्धवट स्थितीत थांबविण्यात आला होता. जर्मनीच्या व्हेरेवने पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली. दुसऱ्या फेरीतील सामन्यात व्हेरेव्हने बल्जियमच्या डेव्हिड गोफिनचा 7-6 (7-4), 6-2, 6-2 असा पराभव केला. रशियाच्या आंद्रे रुबलेव्हचे आव्हान समाप्त झाले. अॅमेल्डीने रुबलेव्हचा 7-6 (8-6), 6-2, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. आर्थर रिंडरनेचने टॉमस मार्टिन इचेव्हेरीचा 6-3, 7-6 (10-8), 1-6 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. दुखापतीमुळे इचेव्हेरीने हा सामना अर्धवट सोडला. जपानचा अव्वल टेनिसपटू केई निशिकोरीने या स्पर्धेत तब्बल 3 वर्षानंतर आपले पुनरागमन केले. पण त्याला दुसऱ्या फेरीतील सामन्यातच खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. निशिकोरीने स्पर्धेतून माघार घेतल्याने अमेरिकेच्या बेन शेल्टनला पुढे चाल मिळाली.

महिलांच्या विभागात अमेरिकेच्या तृतीय मानांकित कोको गॉफने चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. तिसऱ्या फेरीतील झालेल्या सामन्यात गॉफने युक्रेनच्या डायना यास्ट्रेमेस्काचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. गॉफचा चौथ्या फेरीतील सामना इटलीच्या इलिसाबेटी कॉकिरेटोशी होणार आहे. महिलांच्या दुसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात अँड्रीव्हाने बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाचे आव्हान 6-3, 3-6, 7-5 असे संपुष्टात आणत तिसरी फेरी गाठली. पॅव्हेलचेंकोव्हाला मात्र बॉग्डेनकडून हार पत्करावी लागली. बॉग्डेनने हा सामना 6-4, 6-4 असा जिंकून तिसरी फेरी गाठली. बियान्का अँड्रीस्क्यूने कॅलिनस्कायचा 1-6, 7-5, 6-3 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले.

Advertisement
Tags :

.