For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोकोविच पराभूत, व्हेरेव, कोबोली विजयी

06:55 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
जोकोविच पराभूत  व्हेरेव  कोबोली विजयी
Advertisement

मुचोव्हा, हॅलेस, पराभूत, बालाजी, भांब्री दुहेरीत पुढील फेरीत

Advertisement

वृत्तसंस्था, पॅरिस

2026 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत शुक्रवारी सर्बियाचा माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविचला तिसऱ्या फेरीतीच ब्राझीलच्या नवोदित जोओ फोन्सेकाकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे जोकोविचचे 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. जर्मनीचा अॅलेक्सझांडेर व्हेरेव तसेच कोबोली आणि स्वेज्दा यांनी पुरूष एकेरीची चौथी फेरी गाठली. महिलांच्या विभागात कॅरोलिना मुचोव्हाचा तिसऱ्या फेरीत पराभव झाला. दुहेरीमध्ये भारताच्या बालाजी आणि भांब्री यांची विजयी घोडदौड कायम राहिली आहे. महिलांच्या विभागात पोलंडच्या इगा स्वायटेकने लिनेटीचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. तसेच स्वीटोलिना, बेन्सीक, कोस्टुक आणि अँड्रीव्हा यांनीही आपले विजय नोंदवित पुढील फेरीत प्रवेश मिळविला आहे.

Advertisement

पुरूष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात शुक्रवारी ब्राझीलच्या नवोदित जोओ फोन्सेकाने 39 वर्षीय जोकोविचला 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 अशा पाच सेट्समधील लढतीत पराभवाचा धक्का दिला. हा सामना 4 तास 53 मिनिटे चालला होता. या पराभवामुळे जोकोविचचे विक्रमी 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगले. तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात जर्मनीच्या व्हेरेवने फ्रान्सच्या हॅलेसचा 6-4, 6-3, 5-7, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. हॉलंडच्या जेस्पर जाँगने 13 व्या मानांकीत कॅरेन कॅचेनोव्हेचे आव्हान 7-5, 5-7, 6-2, 6-7 (2-7), 6-2 अशा पाच सेट्समध्ये संपुष्टात आणले. स्पेनच्या राफेल जोडारने अॅलेक्स मिचेलसनचा 7-6 (7-2), 6-7 (5-7), 4-6, 6-3, 6-3 तसेच झेकच्या मेन्सिकने ऑस्ट्रेलियाच्या आठव्या मानांकीत अॅलेक्स डी मिनॉरचा 0-6, 6-2, 6-2, 6-3 असा पराभव करत चौथी फेरी गाठली. त्याचप्रमाणे रशियाचा आंद्रे रुब्लेव आणि बुस्टा यांनीही पुरूष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला आहे.

महिलांच्या विभागात तिसऱ्या फेरीतील सामन्यात पोलंडच्या इगा स्वायटेकने लिनेटीचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. तर दुसऱ्या एका सामन्यात स्वीसच्या जिल टिचमनने झेकची गॅरोलिना मुचोव्हाचे आव्हान 6-1, 7-5 असे संपुष्टात आणत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले.

भारताच्या एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा ब्राझीलियन साथीदार डिमो लिनेर यांनी दुसऱ्या फेरीतील सामन्यात जेकॉब स्कॅनेटर आणि मार्क वॉलनेर यांचा 7-5, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत पुरूष दुहेरीची तिसरी फेरी गाठली. मात्र भारताच्या युकी भांब्री आणि न्यूझीलंडचा मिचेल व्हीनस यांचे पुरूष दुहेरीतील आव्हान दुसऱ्याच फेरीत इटलीच्या बोलेली आणि व्हॅवेसोरी यांनी 6-3, 6-4 अशा सरळ सेटमध्ये संपुष्टात आणले. भांब्रीने मिश्र दुहेरीत पॅनोव्हासमवेत पहिल्या फेरीतील सामना जिंकला आहे.

Advertisement
Tags :

.