For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डिक्सन टेक्नॉलॉजी उभारणार कारखाना, 5 हजार जणांना रोजगार

06:24 AM Apr 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
डिक्सन टेक्नॉलॉजी उभारणार कारखाना  5 हजार जणांना रोजगार
Advertisement

चेन्नई :

Advertisement

इलेक्ट्रॉनिक्स निर्माती व सेवा कंपनी डिक्सन टेक्नॉलॉजीज लवकरच तामिळनाडूत कारखाना उभारणार असून याअंतर्गत 5 हजार जणांना रोजगार देणार असल्याची माहिती आहे.

राज्यासोबत सहकार्याचा करार

Advertisement

कंपनी तामिळनाडूतील चेन्नईजवळ आपला निर्मिती कारखाना उभारणार असून त्याकरीता 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात कंपनीने तामिळनाडू सरकारबरोबर सहकार्याचा करार (एमओयु) केला आहे. कांचीपुरम जिल्ह्यानजिक ओरगडम येथे सदरचा कारखाना स्थापन होत असून तेथे 5 हजार जणांना कंपनी रोजगार देणार आहे.

लॅपटॉप, कॉम्प्युटरची निर्मिती

तामिळनाडूतील लोकांना रोजगाराची संधी कंपनी उपलब्ध करणार आहे. दक्षिण चेन्नईपासून 45 किमीवर हा कारखाना होणार असून तेथे लॅपटॉप व पर्सनल कॉम्प्युटर्स निर्मिती करण्यासोबत इतर इलेक्ट्रॉनिक निर्मिती सेवा इतर कंपन्यांना देते.

Advertisement
Tags :

.