डिक्सन, केन्सचे समभाग घसरणीत
06:22 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डिक्सन, केन्स यांचे समभाग गेल्या दोन सत्रात चांगलेच घसरले आहेत. गेल्या दोन दिवसात समभाग जवळपास 8 टक्के इतके घसरले आहेत. केन्स टेक्नॉलॉजीचा समभाग बुधवारी इंट्राडे दरम्यान 3682 रुपयांवर आला असून 52 आठवड्यानंतर समभागाने नीचांकी दर गाठला आहे. दोन दिवसात समभाग 8 टक्के खाली आला आहे. तर दुसरीकडे डिक्सन टेक्नॉलॉजीचा समभाग 2 टक्के घसरत बुधवारी 11480 रुपयांवर आला होता. गेल्या दोन सत्रात समभाग 5 टक्के घसरणीत राहिला आहे. 52 आठवड्याच्या उच्चांकानंतर समभाग 38 टक्के घसरला आहे.
Advertisement
Advertisement