महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अनगोळ येथे दिवाळी पाडव्यानिमित्त स्पर्धा उत्साहात

12:36 PM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिल्यांदाच आयोजन : गाव मर्यादित गाय, वासरे, म्हशींची स्पर्धा : रेड्याला विशेष सन्मान

Advertisement

बेळगाव : दिवाळीच्या पाडव्यानिमित अनगोळ येथे पहिल्यांदाच अनगोळ गाव मर्यादित गाय, वासरे व म्हशींची स्पर्धा रविवारी सायंकाळी हणमण्णावर गल्ली येथे गावातील गवळी बांधव व शेतकरी बांधवांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी गावातील शेतकरी व गवळी बांधवांनी आपापल्या जनावरांची आकर्षक सजावट करून आपल्या जनावरांसह स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.  शिंगांना आकर्षक रंग, रिबन, मोरपंख, गोंडे, गळ्यात साखळ्या व कवड्याच्या माळा, घंटांचे सर, पायात घुंगरू, पायात गोंडे, शिंगांना आकर्षक मोरपिसांचे टोप, डोळ्यात काजळ, तोंडावर आकर्षक कवड्याच्या मोकाडकी, अंगावर गुलाल, भंडारा, विविध रंगांनी रेखाटण्यात आलेली फुले अशा विविध प्रकारच्या आकर्षक सजावटी करून गवळी बांधवांनी आपल्या जनावरांना सजविले होते. सायंकाळी हणमण्णावर गल्ली, आझाद चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गो-माता, लक्ष्मी-गणपती फोटो पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर गवळी बांधवांनी आपल्या सजविलेल्या गाई, म्हशी, रेडके, वासरे यांना घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी कसरती दाखविल्या. स्पर्धेसाठी पंच म्हणून देवेंद्र बुद्यण्णावर, अण्णासाहेब गुंडप्पणावर, देवेंद्र यल्लमण्णावर, महावीर हणमण्णावर व भरमा मजुकर यांनी काम पाहिले.

Advertisement

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

संतोष पुजेरी यांच्या रेड्याला विशेष बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनगोळ येथील सामाजिक कार्यकर्ते व श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ विभागप्रमुख उमेश कुऱ्याळकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी गावातील शेतकरी, गवळी बांधव व प्रमुख पाहुणे म्हणून पंच उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुणे, देणगीदार यांचा भगवे फेटा बांधून सन्मान करण्यात आला. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गवळी बांधवांना पांढरी टोपी घालून सन्मानित करण्यात आले. सुनील कलकुप्पी यांनी स्वागत केले. बबलु जाधव यांनी आभार मानले. या स्पर्धेसाठी हणमण्णावर गल्ली येथील कार्यकर्त्यांनी तसेच गावातील ज्येष्ठ पंच, शेतकरी व गवळी बांधवांनी सहकार्य केले.

शनिवारी गावात सजविलेल्या गाई-म्हशींची मिरवणूक

अनगोळ गावातील गवळी बांधवांच्यावतीने दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सजविलेल्या गाई, म्हशी व लहान वासरे यांची शनिवारी दुपारी वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक गवळी बांधवांनी आपल्या जनावरांना आकर्षक पद्धतीने सजविले होते. यावेळी लोहार गल्ली, मारुती गल्ली, झेरे गल्ली, बाबले गल्ली, भांदूर गल्ली, हणमण्णावर गल्ली, सुभाष गल्ली येथील गवळी बांधवांनी मोठ्या उत्साहात मिरवणुकीत सहभाग घेतला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article