Sangli : 'माणुसकीचं नातं'च्यावतीने गरजूंना दिवाळी कीट
इस्लामपूरात ‘माणुसकीचं नातं’ प्रतिष्ठानतर्फे गरजूंना दिवाळीची गोड भेट
इस्लामपूर : माणुसकीचं नातं प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाडी दिवाळी गरजूंसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. व्हॉट्सअप ग्रुपवर केलेल्या आवाहनातून अवघ्या दोन-तीन दिवसात जमा झालेल्या सुमारे दीड लाखाच्या निधीतून निराधार, फाही दिव्यांग आणि अतिशय गरजू कुटुंबांना दिवाळीचे किट घरपोहोच करण्यात आले.
या दिवाळी किटमध्ये साखर, रवा, मैदा, पोह्यासाठीचे हाळे, चिवडा मसाला, चकली मसाला, मोती साबण, अलमंड तेल, खोबरे, चकली पीठ, गोडेतेल, तयार बुंदी, उटणे, पणती पॅकिंग, मका पोडा, स्पेशल पोडा, असे एका कुटुंबाला सहज पुरेल अशा चांगल्या वर्गाच्या मालाचे किट आहे अनाथ, विव्यांग, विकट आर्थिक स्थिती असणाऱ्या कुटुंबातील लाभार्थ्यांना ही किट देण्यात आले. यंदाची दिवाळी पण गरजूंसाठी या उपक्रमांतर्गत शहरातील साठेनगर, नवे
बड़े, तांबवे, कापूसखेड, नागठाणे, अशा ठिकाणी सर्वे करून निवडलेल्या गरजूंना किट पोहचवण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात तत्कालीन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या संकल्पनेतून डा परिवार आकाराला आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह उद्योजक सर्जेराव यादव, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक शिंदे तसेच इस्लामपूर शहरातील डॉ क्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, उद्योजक आणि समाजभान असणारी अनेक मंडळी या परिवारात सहभागी होत गेली.
संयोजनासाठी सर्व समावेशक कार्यकारिणी असून त्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत बारके उमेश कुरळपकर, प्रा.डॉ. मदेशजोशी, गौतम रायगांधी, उद्योजक विकास राजमाने, दीपक कोठावळे, सतीश सूर्यवंशी, अॅड. विजय काहंगडे, प्रा. नसरीन शेख, अमित यादव, यांचा समावेश आहे.
सामाजिक उपक्रम व निस्वार्थी भावना..
कोरोना काळात ६७ विवस सुमारे ७५० गरजू कुटुंबांना दिलेल्या फूड पॅकेटस पासून ते मधल्या काळात प्रतिवर्षी दि. १ मे रोजी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या निमित्ताने महा रक्तवान शिबिर (प्रतिवर्षी ६०० ते ९०० पेक्षा जास्त रक्तदान), इस्त्रामपूर पोलीस ठाण्याशेजारी जायंट्स ग्रुपच्या सहकायनि मोफत ओपन जिम, मोफत अभ्यासिका गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, असे उपक्रम राबविले जातात.