For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : 'तरुण भारत संवाद'चा दिवाळी अंक वाचकांना सुवर्ण पर्वणी : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

12:27 PM Oct 24, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur    तरुण भारत संवाद चा दिवाळी अंक वाचकांना सुवर्ण पर्वणी   पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Advertisement

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ‘तरुण भारत संवाद’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

Advertisement

गारगोटी : जगात भारी कोल्हापुरी हा दिवाळी अंक 'तरुण भारत संवाद "ने प्रसिद्ध करून वाचकांना एक सुंदर भेट दिली असुन दिवाळी फराळा बरोबरच दिवाळी अंक ही सुवर्ण पर्वणी ठरणार आहे असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयात 'तरुण भारत संवाद'च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन राज्याचे आरोग्यमंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा झाला. यावेळी सहकार बोर्डाचे उपाध्यक्ष अमित देसाई, युवा सेना तालुका प्रमुख विद्याधर परीट, प्रा. सुनिल मांगले, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, तालुका प्रतिनिधी अनिल कामिरकर, पत्रकार प्रकाश सांडुगडे, आर के पाटील, प्रकाश खतकर, नवमहाराष्ट्र क्रेडिट सोसायटीचे मॅनेजर साताप्पा मोरे, किशनभाई जठार उपस्थित होते.

Advertisement

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा सत्कार तरुण भारत संवाद परिवाराच्या वतीने सर्व वार्ताहरांनी केला. उपस्थित वाचकांनी दिवाळी अंकाचे स्वागत करून अंकाचे कौतुक केले.

Advertisement
Tags :

.