Kolhapur : दिवाळी झाली, आता निवडणुकीची तयारी..!
शहरवासियांचे आरक्षण सोडतीकडे तर ग्रामीणचे आचारसंहितेकडे लक्ष
कोल्हापूर : दिवाळीच्या मंगलमय वातावरणाचा मुहूर्त साधत महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या इच्छुकांनी डिजिटल फलक, शुभेच्छा पत्र, भेटवस्तू देत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. दिवाळीचा सण झाला असून आता निवडणुकीच्या पुढील तयारीसाठी इच्छुकांना ताकदीने काम करावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत पर्यंतची प्रक्रीया पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष निवडणुकीच्या आचारसंहितेकडे लागले आहे. तर शहरात मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरु असुन शहरवासियांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागून राहिले आहे. जि.प.सह महापालिकेची निवडणुक तोंडावर आल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे.
जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालाने दिला आहे. त्यामुळे या मुदतीत निवडणुक प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरु आहे. तर अवघा महिना, दोन महिन्यांवर निवडणुक परिषद निवडणुक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांकडून प्रभागात संपर्क वाढविण्यासाठी राबता सुरु आहे.
आचारसंहिता, आरक्षण सोडतकडे लक्ष
जिल्हा परिषद निवडणुची प्रक्रिया 5 बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. आरक्षण सोडत झाल्यामुळे निवडणुक लढायची का नाही याची स्पष्टता जि.प.च्या इच्छुकांना मिळाली आहे. त्यामुळे जि.प. निवडणुकीसाठी आता ग्रामीण भागातील जनेतेचे लक्ष आचार संहितेच्या घोषणेकडे असणार आहे. तर महापालिका 5 निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रीया सुरु आहे. अद्याप आरक्षण सोडत न झाल्यामुळे अनेकांना निवडणुक लढविण्यासाठी वेट अँड वॉच करावे लागत आहे. आरक्षण सोडतनंतरच मनपा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.
जिल्हा व्यापला इच्छूकांच्या शुभेच्छा फलकांनी
जि.प., मनपा निवडणुक लागोपाठ होणार असल्याने शहरासह ग्रामीण भागातही स्थानिक संस्थां निवडणुकीचे स्वराज्य वारे वाहू लागले आहे. इच्छुकांनी दीपावलीचा महूर्त साधत शुभेच्छा फलकांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात चौका-चौकात सुमारे आठ ते दहाहून अधिक दीपावलीच्या शुभेच्छा देणारे फलक उभारले आहेत. ग्रामीण भागातही हेच चित्र आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जिल्हा इच्छूकांनी शुभेच्छा देण्यासाठी उभारलेल्या डिजिटल आहे.
मनपा निवडणुकीसाठी वेट अँड वॉच
महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. दीपावली सणामध्ये या इच्छुकांनी जोरदार मार्केटींग केले. मात्र अद्याप निवडणुकीसाठी आरक्षण सोडत होणे बाकी आहे. त्यामुळे आरक्षण सोडतमध्ये अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षीय पातळीवर निवडणुक झाल्याने अनेकांना नेत्यांच्या आदेशानुसार थांबावे लागेल अन्यथा बंडखोरी करावी लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मार्केटींग केले असले तरी त्यांना आरक्षण सोडत आणि तिकीट वाटपापर्यंत वेट अँड वॉच करावे लागणार आहे.
इच्छूक ढिगभर.... 'ह्यो कोण रे?'
महापालिका निवडणुक लढण्यासाठी प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची संख्या ढिगभर झाली आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांनी उभारलेली डिजिटल फलकांची संख्या पाहता सुमारे १५ ते २० हून अधिक इच्छूक प्रभागात असल्याचे दिसून येते. प्रभागातील मोक्याच्या ठिकाणी जागा मिळेल तिथे शुभेच्छा फलक उभारले आहेत. प्रथमच चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुक होत असल्याने इच्छुकांना आपल्या मूळ प्रभागासह अन्य तीन प्रभागात संपर्क वाढवावा लागणार आहे. यासाठी संपूर्ण चार प्रभागात फलक उभारले आहेत. यापैकी अनेक चेहरे नवीन वाटत असल्याने शुभेच्छा फलक पाहून कोण रे ह्यो असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.