For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाळेकुंद्री भागात श्रीरामाच्या जयघोषात प्रति दिवाळी साजरी

10:26 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाळेकुंद्री भागात श्रीरामाच्या जयघोषात प्रति दिवाळी साजरी
Advertisement

भजन, नामजपाने वातावरण राममय : फटाक्यांची आतषबाजी

Advertisement

वार्ताहर /बाळेकुंद्री

बाळेकुंद्री खुर्द व परिसरातील मोदगा, मारिहाळ, सुळेभावी, करडीगुद्दी व इतर भागातही श्रीराम प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा आनंदात व जल्लोषात साजरा केला. गावच्या प्रमुख मार्गांवर, गल्लीच्या कोपऱ्यांवर भगवे रामप्रतिमेचे ध्वज, भगव्या पताकांनी वातावरण चैतन्यमय झाले होते. गावच्या विविध मंदिरांत अभिषेक झाल्यानंतर गावात श्रीराम की जयचा जयघोष ठिकठिकाणी सुरू होता. दुपारी साडेबारा वाजता अयोध्येत श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होताच हनुमान मंदिरासह गावात भक्तांनी फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष केला. दुपारी गावातील संत बाळूमामा मंदिरात महाप्रसाद वाटप करण्यात आला. सांयकाळी  शिवाजी चौकापासून शोभायात्रा काढली. मंदिर परिसरात व घरासमोर दीप लावले होते. गल्लीत सुंदर व आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. गावात घरावर भगवे ध्वज लावण्यात आले होते. मारिहाळ, सुळेभावी गावही श्रीराममय झाले होते. गावात शिवाजी महाराज चौकात पूजेचे आयोजन केले होते. प्रमुख गल्लीतून श्रीराम प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. राम सीता लक्ष्मण हनुमान आदी वेषातील बालचमू लक्ष वेधून घेत होते. मंदिरात दीपोत्सव व आतषबाजी करण्यात आली. महाप्रसादाचेही आयोजन केले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.