दिवाळीतही ड्युटी बजावणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
शेर्लेतील सामाजिक कार्यकर्त्यांकडून कौतुक
प्रतिनिधि
बांदा
सातोसे, मडूरा परिसरात ओंकार हत्तीचे वास्तव्य असल्याने हत्ती लोकवस्ती पासून दूर राहण्याकरिता, हत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता एकूण ६० वन कर्मचारी सतत हत्तीवर नजर ठेऊन आहेत.आज आपण सर्व लोकं दिवाळी साजरी करत असतानाही वन कर्मचारी हे ओंकार हत्ती वर नजर ठेऊनच आहेत. त्यामुळे त्यांना घरी दिवाळी देखील साजरी करता आलेली नाही. तरी त्यांची देखील दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने शेर्ले गावातील सामाजिक कार्यकर्ते ओंकार धुरी, आबा धुरी यांच्या माध्यमातून आज सातोसे गावात जाऊन सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व वन कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेछया देऊन एक छोटीशी दिवाळी भेट देण्यात आली. तसेच ते करत असलेल्या कामाचे देखील कौतुक करण्यात आले. आज त्यांच्यामुळे लोक हत्ती पासून सुरक्षित आहेत. दिवाळी भेट देण्यात आल्याने वन कर्मचाऱ्यांनी देखील सर्वांचे आभार व्यक्त केले.सदर वेळी शेर्ले ग्रामपंचायत उपसरपंच दीपक नाईक,ग्रामपंचायत सदस्य. बाळा शेर्लेकर, आबा धुरी, लतेश धुरी उपस्थित होते.