"उमेद फाउंडेशन कडून कातकरी वस्तीत "दिवाळी फराळ वाटप"
तळेरे
सलग तिसऱ्या वर्षी उमेद फाउंडेशन कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गरजू, गरीब कुटुंबांना दिवाळी फराळ वाटण्याची मोहिम राबवण्यात आली.यावर्षी उमेद सदस्यांनी कणकवली येथील गणपती सान्याजवळील झोपडपट्टी वस्तीतील कातकरी समाजातील गरजू कुटुंबातील सदस्यांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. वंचितांना दिवाळी फराळ कीट,स्वच्छता कीटचे वाटप करण्यात आले.त्यांच्या अंधारमय जीवनात तेजोमय प्रकाश आणण्याचे काम केले.
या निमित्ताने सडा रांगोळी घालून,आकाशकंदील,दिवेलावून,तेथील वंचितांना दिवाळी फराळ कीट,स्वच्छता कीट वाटप करण्यात आले. त्यावेळी तेथील गरजू कुटुंब व बालगोपाळांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.या दिवाळी कीटमध्ये अंघोळीचा मोती साबण, सुगंधी तेल, उटणे, आकाश कंदील, पणत्या, लाडू,चिवडा,चकली, शंकरपाळी इ. वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब, वंचित कुटुंबे,तसेच जिल्ह्यातील वृद्धाश्रम आणि अंध,मतिमंद शाळा व आश्रम या ठिकाणी दिवाळी कीट वाटप करण्यात आले.
यावेळी सूर्यकांत चव्हाण, ए.डी.राणे, विजय मसुरकर, विजय भोगले, विनायक जाधव, अजित कदम,हेमंत राणे, प्रतिभा कोतवाल, वंदना राणे, पालव मॅडम, श्री.महाजन, करंबेळकर मॅडम, प्रदीप नाळे, राजेंद्र पाटील, युवराज पंचकर, जयकुमार पाटील, शैलजा कदम, स्वप्निल तोडकर, राजेंद्र पाटील, जाकीर शेख, जे.डी. पाटील, शितल पाटील, शोभा पाटील, स्वाती पाटील, नितीन पाटील हे उमेदीयन उपस्थित होते.दिवाळी मोहिमेचे प्रमुख राजेंद्र पाटील यांनी ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल सर्व देणगीदार,उमेदीयन,पत्रकार यांचे विशेष आभार मानले.
उमेद फाउंडेशन तर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीट वाटप करण्यात येते.तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप, वंचित कुटुंबांना, आश्रमांना गरजेनुसार मदत करण्यात येते.क्रीडा स्पर्धा वेळी "प्रथमोपचार कीट" वाटप, राज्यभरातून "उमेद मायेचं घर" येथील वसतिगृहात सत्तावीस गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारुन त्यांची मोफत राहणे,खाणे आणि शिक्षणाची सोय करीत आहे.असे अनेक विविध सामाजिक उपक्रम उमेद फाउंडेशनच्या वतीने राबविले जात आहेत.उमेद फाउंडेशनच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.