इन्सुलीत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी बोनस वितरण
बांदा प्रतिनिधी
इन्सुली सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेचा सन 2024 - 2025 या आर्थिक वर्षाचा बोनस १९८ दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना ५ लाख 29 हजार रुपये एवढा वितरण करण्यात आला. हा कार्यक्रम सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संस्था अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर ,सचिव जगन्नाथ झाट्ये ,संचालक संजय सावंत ,सखाराम बागवे विलास गावडे ,गीतांजली हळदणकर ,सुहानी गावडे ,सुधीर गावडे, जगन्नाथ नाटेकर, अशोक पडवळ, शरद कोठावळे, तसेच दुग्ध उत्पादनात प्रथम क्रमांक प्राप्त आनंद शेट्ये आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पेडणेकर यांनी दुग्ध संस्थेमार्फत दुग्ध उत्पादकांना सहा टक्के बोनस दिल्याचे सांगितले. दरवर्षी गणेश चतुर्थीला शिधा भेट तसेच वर्धापन दिनाला गोठ्यात उपयोगी येणाऱ्या भेटवस्तू दुग्ध उत्पादकांना दिली जाते . दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी आपला हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून या दुग्ध उत्पादनातून आपली आर्थिक उन्नती साधावी. शासनाच्या वतीने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत त्यांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले .