महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पहिली पणती महाराजांसाठी !

10:44 AM Nov 10, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा दिवाळीत उपक्रम

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

Advertisement

दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या चार वर्षांपासून दिवाळीत जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शिवाजी महाराजांच्या स्मारकांसमोर पणत्या लावून दीपावली साजरी केली जात असून यावर्षीही मावळ्यांनी तसेच शिवप्रेमींनी आपल्या जिल्ह्यातील दुर्लक्षित झालेल्या महाराजांच्या स्मारकांची स्वच्छता करून स्मारकांसमोर किमान एक पणती लावून दिवाळी साजरी करावी असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत गेल्या चार वर्षांपासून दिवाळीत पहिली पणती आपल्या महाराजांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतात. यावर्षीही शिवभक्तांनीआपल्या गावातील महाराजांच्या स्मारकांची स्वच्छता करून किमान एक पणती लावावी. ज्यांच्या जवळ महाराजांचे स्मारक नसेल अशा शिवभक्तांनी आपल्या घरातच महाराजांच्या मूर्ती किंवा फोटो समोर पणती ठेवावी.

शिवप्रेमींनी आपण कोणत्या गावातील महाराजांच्या स्मारकासमोर पणती लावून दीपावली साजरी करणार आहात त्या गावाचे नाव, आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक ही माहिती तसेच प्रत्यक्ष दीपावली साजरी करत असतानाची छायाचित्रे दुर्ग मावळा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रसाद सुतार ९४०४५९८१४७ यांच्या मोबाईलवर पाठवावीत. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या शिवप्रेमींना दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमात शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
# sawantwadi # tarun bharat news #
Next Article