For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पेद्दी’ मध्ये दिव्येंदु शर्मा

01:19 PM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘पेद्दी’ मध्ये दिव्येंदु शर्मा
Advertisement

रामचरणची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘पेद्दी’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर नायिकेच्या भूमिकेत आहे. तर दिव्येंदु शर्मा हा ‘रामबुज्जी’च्या भूमिकेत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पेद्दीच्या निर्मात्यांनी दिव्येंदुची सेटवरील रोमांचक झलकही शेअर केली आहे. हा चित्रपट 4 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रामचरणचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दर्शविण्यात येणार आहे. बुची बाबू सना यांच्याकडून लिखित आणि दिग्दर्शित ‘पेद्दी’मध्ये रामचरण, शिव राजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदु शर्मा आणि जगपती बाबू दिसून येणार आहेत. रामचरण याचा हा चित्रपट प्रेक्षकांदरम्यान जबरदस्त उत्सुकता निर्माण करत आहे. या चित्रपटाचा प्रीमियर 3 जून रोजी जगभरात होणार आहे, तर 4 जून रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.