दिव्यांगजन संपूर्ण देशासाठी विशेष
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्तचे उद्घाटन
पणजी : गोव्याची भूमी आज जांभळ्या रंगाची झाली आहे. 2023 साली गोव्यात झालेल्या राष्ट्रीय पर्पल महोत्सवाचा पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमात विशेष उल्लेख झाला होता. दिव्यांग व्यक्ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी विशेष आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सहा दिवसीय आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तनावडे, इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्पल महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
पंतप्रधानांचा संदेश
मुख्यमंत्री म्हणाले की, दिव्यांग हे ‘अपंग’ नसून देशासाठी ‘विशेष’ आहेत. सावंत यांनी पंतप्रधानांच्या स्किल इंडिया, फिट इंडिया आणि सर्वसमावेशक भारताच्या घोषणांना पुढे नेण्यावर भर दिला. कार्यक्रमादरम्यान, गोव्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनीही सर्वसमावेशकतेचा उत्सव साजरा करणाऱ्या या उत्सवातील सहभागींसाठी पंतप्रधानांचा संदेश वाचून दाखवला.
केंद्रात स्वतंत्र मंत्रालय
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की, हा सण सर्वसमावेशकतेच्या भावनेने साजरा करतो. हा एक टप्पा आहे जिथे प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केंद्रात स्वतंत्र मंत्रालय निर्माण करून दिव्यांग व्यक्तींवर विशेष भर दिला आहे.
अद्वितीय उत्सव
डॉ. कॅरेन डार्क, पॅरालिम्पियन आणि यूएस स्थित व्हॉईस ऑफ स्पेशली एबल्ड पीपलचे राजदूत म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव हा एक अद्वितीय उत्सव आहे, जो दिव्यांग व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी समर्पित भारताचा सर्वसमावेशक उत्सव दर्शवतो. हा उत्सव आम्हाला पुढील सहा दिवस शिकण्यासाठी, नेटवर्क करण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आणणार आहे. दिव्यांगजनांसह कलाकार मुले मनोरंजन, गायन आणि नृत्य सादरीकरणासह आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन केले. याचबरोबर यावेळी दिव्यांगजनांसाठी पर्पल टीव्ही भारतचे अनावरण या महोत्सवात करण्यात आले. टीव्ही चॅनेलवर दिव्यांगजनांच्या कल्पना, यशोगाथा, मुलाखती आणि जगभरातील त्यांच्या यशोगाथा सादर करत, त्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक प्रसारमाध्यम व्यासपीठ उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय पर्पल गीतचे अनावरण करण्यात आले.
सर्वसमावेशकतेचा उत्सव : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
संजीवनी साखर कारखाना निश्चित सुरू होणार आहे. कारखाना बंद ठेवला म्हणून शेतक्रयांना व्रायावर सोडले नाही. कारखान्याबाबत दोनदा निविदा काढण्यात आल्या होत्या. आताही काढण्यात आले आहे. घरबसल्या शेतक्रयांना मागील तीन वर्षे पैसे मिळत आहे. पुढेही मिळणार. आता ते केवळ ’शो ऑफ करण्यासाठीच आझाद मैदानावर जमले आहेत. दोन तीन दिवसात निविदा येणार. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवा 2024 साठी गोव्यात एक अनोखे आणि विशेष औत्सुक्याचे वातावरण आहे. या महोत्सवासाठी सर्व देशी-विदेशी प्रतिनिधींचे मोठ्या आनंदाने स्वागत करत आहे. हा सोहळा दिव्यांगजनांसह सर्वसमावेशकता साजरा करण्याचा क्षण आहे, असे मत समाजकल्याणमंत्री सुभाष फळ देसाई यांनी व्यक्त केले. महोत्सवात भूतान, जपान व इतर देशातील प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला आहे. पर्पल महोत्सव एक महत्त्वपूर्ण महोत्सव असून लोकांचा हा महोत्सव आहे असे मत गोवा राज्य दिव्यांग जन आयुक्त गुऊप्रसाद पावस्कर यांनी व्यक्त केले.