‘एक चतुर नार’मध्ये दिव्या खोसला
नील नितिन मुकेशही मुख्य भूमिकेत
दिव्या खोसला आणि नील नितिन मुकेश यांचा आगामी चित्रपट ‘एक चतुर नार’चा फर्स्ट लुक जारी करण्यात आला आहे. हा चित्रपट कॉमेडी-ड्रामा धाटणीचा असून याचा फर्स्ट लुक समोर आल्यावर प्रेक्षक आता यावरून उत्साहित झाले आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाच दोन मोशन पोस्टर्स जारी केली आहेत. एका पोस्टरमध्ये दिव्या खोसला आणि नील हे एका टेबलानजीक उभे असून टेबलवर टोमॅटोसह काही भाज्या ठेवण्यात आल्याचे दिसून येते. यात दिव्या गाजर चाकूने कापत कॅमेऱ्याकडे धूर्त नजरेने पाहत आहे. तर बाजूला नील हा थ्री पीस परिधान करून आणि हातात बंदूक धरून उभा आहे.
या विनोदी धाटणीच्या चित्रपटात नील आणि दिव्या एका वेगळ्या अवतारात दिसून येणार आहेत. टी-सीरिजकडुन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले आहे. ‘एक चतुर नार’ हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिव्या ही टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी आहे. दिव्या यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली आहे.