‘मायासभा‘मध्ये दिव्या दत्ता
प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या दत्ता बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते, आता ती तेलगू मनोरंजनक्षेत्रात स्वत:च्या अभिनयाची जादू दाखवून देणार आहे. अभिनेत्री ‘मायासभा’ नावाच्या वेबसीरिजमधून तेलगू मनोरंजनक्षेत्रात पाऊल ठेवत आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये दिव्या दत्ता ही एका राजकीय नेत्याच्या रुपात दिसून येत आहे. राज्याचे नशीब बदलणारी ही कहाणी असल्याचे दिव्याने नमूद केले आहे. पहिली वेळ नेहमीच खास असते आणि मी दीर्घकाळापासून तेलगू मनोरंजनक्षेत्रात काम करू इच्छित होते. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधील वाढत्या ताळमेळीदरम्यान मला या सीरिजसोबत सुरुवात करण्याबद्दल गर्व आहे. दाक्षिणात्य पार्श्वभूमीची ही सीरिज अत्यंत आकर्षक असल्याचे तिने म्हटले आहे. ही सीरिज राजकीय पार्श्वभूमीवर आधारित आहे. सोनी लिववर ही सीरिज पाहता येणार आहे. यात साई कुमार, श्रीकांत अय्यंगर, नासर, तान्या रविचंद्रन, रविंद्र विजय आणि शत्रू यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.