For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिव्या देसाईचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

06:22 AM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिव्या देसाईचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

झुंजवाड (ता. खानापूर) येथील दिव्या प्रदीप देसाई हिने दहावी परीक्षेत 625 पैकी 625 गुण मिळवून कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. या निमित्ताने तिचा बेंगळूर येथे नुकताच सत्कार करण्यात आला. लोकभवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला विविध मान्यवरांच्या हस्ते तिचा सन्मान झाला.

राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विधानसभेचे अध्यक्ष जी. ए. पाटील यांच्यासह मुख्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत तिचा गौरव करण्यात आला. झुंजवाडसारख्या लहानशा गावात अभ्यास करून दिव्याने दहावी परीक्षेत यश मिळविले हेते. बिडी येथील होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सध्या ती बेळगावच्या गुरुदेव जंबगी कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.