For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिव्या अग्रवाल करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

06:11 AM Apr 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिव्या अग्रवाल करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
Advertisement

आगामी बॉलिवूड भयपटाचे फर्स्ट लुक पोस्टर समोर आले आहे. या चित्रपटाची निर्मिती ज्योति राज गवळी करत असून दिग्दर्शनाची धुरा सौरभ चौबे यांनी सांभाळली आहे.  या चित्रपटाचे नाव ‘द वॉर्डरोब“ असून यात दिव्या अग्रवाल आणि रजनीश दुग्गल हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Advertisement

पोस्टरमध्ये एका जुन्या, अर्धवट खुल्या लाकडी कपाटातून एक रहस्यमय महिला बाहेर येताना दाखविण्यात आली आहे. कपाटातून बाहेर पडणारा लाल प्रकाश, रक्ताने माखलेला पांढरा गाउन पोस्टरला अधिक भीतीदायक स्वरुप देत आहे.

टीव्ही रियलिटी शोची विजेती राहिलेली दिव्या अग्रवाल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाने मला कलाकार म्हणून आव्हान दिले आहे. कहाणी अत्यंत ग्रिपिंग आणि अॅटमॉस्फेरिक आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट लवकरात लवकर पहावा अशी माझी इच्छा असल्याचे दिव्याने म्हटले आहे. तर या चित्रपटात सस्पेन्स आणि सायकोलॉजिकल एलिमेंट्सचे उत्तम संतुलन असल्याचे रजनीश दुग्गलने म्हटले आहे. हा चित्रपट 24 एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.