उद्या आंबोली व कलंबिस्त येथे वीज ग्राहकांची विभागीय बैठक
सावंतवाडीची तालुका वीज ग्राहक संघटनेचे आयोजन
ओटवणे | प्रतिनिधी
वीज उपकेंद्र निहाय वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेने शनिवार १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंबोली ग्रामपंचायत तर सायंकाळी ३ वाजता कलंबिस्त ग्रामपंचायत येथे विज ग्राहकांच्या विभागीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आंबोली विभागातील आंबोली, गेळे, चौकूळ आदी गावातील तर कलंबिस्त विभागातील माडखोल, सांगेली, सावरवाड, कलंबिस्त, वेर्ले, शिरशिंगे, गोठवेवाडी आदी गावातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण केले जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना कार्यरत असून जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना कार्यरत आहे. सावंतवाडी तालुक्यातील गावागावांमध्ये वीज ग्राहक संघटना पोहोचलेली असून गावातील वीज समस्यांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. याच उद्देशाने या विभागीय बैठकांचे आयोजन करण्यात आले असुन या दोन्ही विभागांतील वीज ग्राहकांच्या समस्या महावितरणकडून सोडविण्यासाठी वीज ग्राहक संघटनेकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्हा तसेच सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आंबोली आणि कलंबिस्त ग्रामपंचायत विभागातील वीज ग्राहकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात आणून उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेने केले आहे.