Solapur News : संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांनी केली पाहणी
01:53 PM Jun 06, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
पंढरपूर : तालुक्यातील पिराची कुरोली व माळशिरस तालुक्यातील बोरगाव, अकलूज येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी तळाची व मार्गाची पाहणी विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी एस. कार्तिकयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, सहाय्यक प्रांताधिकारी सचिन इथापे, बिजया महामार्ग कार्यकारी पांगारकर, राष्ट्रीय प्राधिकरणाचे औटी, अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार.
जिल्हा नगर विकास प्रशासन अधिकारी योगेश डोके, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते. यावेळी पालखी तळाची स्वच्छता, सपाटीकरण, चिखल होऊ नये म्हणून मुरूम टाकणे, पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी यावेळी दिल्या.
Advertisement
Advertisement