मिनी ऑलिम्पिकसाठी जिल्हा संघाची निवड
निवड चाचणीत 20 खेळाडूंचा समावेश : 15 दिवसांचे प्रशिक्षण शिबीर
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त मिनी ऑलिम्पिक स्पर्धे दरम्यान बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित केलेल्या 14 वर्षांखालील मुलांच्या निवड चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 100 खेळाडूंनी यामध्ये भाग घेतला होता. कॅम्प येथील गुड्सशेफर्ड फुटबॉल मैदानावर ही निवड चाचणी झाली. जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, सचिव अमित पाटील, अल्लाबक्ष बेपारी, प्रशांत देवदानम, फिरोज शेखसह इतर क्रीडाशिक्षक उपस्थित होते. या निवड चाचणीत 100 खेळाडूंमधून 20 खेळाडूंची निवड करण्यात आली. या 20 खेळाडूंना 15 दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. संघव्यवस्थापक मानस नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संघ सराव करणार आहे. बेंगळूर येथे होणाऱ्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बेळगाव संघ बेंगळूरला रवाना होणार आहे.