जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली ठाकरेंच्या सभा नियोजनाची पाहणी
चोख बंदोबस्त ठेवणार ; SP अग्रवाल यांनी दिल्या सूचना
सावंतवाडी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 फेब्रुवारीला सावंतवाडी दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सावंतवाडी गांधी चौक येथे उद्धव ठाकरे यांच्या सभा नियोजनाची पाहणी केली. सभेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सावंतवाडीतील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे, पोलीस निरीक्षक सचिन हुंडळकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, मायकल डिसोझा, तसेच ठाकरे सेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना फुटी नंतर उद्धव ठाकरेंचा सिंधुदुर्गातील हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. उद्धव ठाकरेंच्या सावंतवाडीतील सभेला तुफान गर्दी असेल असा विश्वास ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सभेत अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सावंतवाडीतील पोलीस अधिकाऱ्यांना चोख बंदोबस्ताच्या सूचना दिल्या आहेत.