कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेत जिल्हा राज्यात अव्वल

05:30 PM Mar 20, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली :

Advertisement

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये गत आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ५३८ लाभार्थीच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून, सध्या ही योजना राबवण्यात जिल्हा देशात द्वितीय स्थानी व राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली आहे.

Advertisement

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना सन २०२०-२१ ते २०२५-२६ या सहा वर्षासाठी केंद्रीय उद्योग मंत्रालयाद्वारे लागू केली आहे. या योजनेमध्ये सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांचा विस्तार वाढविणे, नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे व असंघटित उद्योगांना संघटित स्वरूप देणे, या क्षेत्राच्या प्रकल्पांच्या औपचारिकीकरणाला प्रोत्साहन देण्यात येते.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन २०२०-२०२१ पासून १२६७ प्रकल्प मंजूर असून लाभार्थीना ३६.३७ कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

त्यापैकी सन २०२४-२५ यावर्षी एकूण ५३८ लाभार्थ्यांचे प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून १२.६७ कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने बेदाणा प्रक्रिया, अन्नधान्य प्रक्रिया, मसाला उद्योग, बेकरी पदार्थ, पशुखाद्य निर्मिती प्रक्रिया इत्यादी प्रकल्पाचा समावेश आहे. या योजनेद्वारे सुमारे ३४६५ कुशल व अर्धकुशल कामगारांना रोजगार निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

कुंभार म्हणाले, सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातून आजअखेर १२६७ प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून प्रकल्प मंजूर करण्याच्या बाबतीत जिल्हा देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापैकी २०२४-२५ यावर्षी जिल्ह्यास ४७८ लक्षांक असून ५३८ साध्य असून सांगली जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. सांगली जिल्ह्यात १२७२ वैयक्तिक लाभार्थी, स्वयंसहाय्यता गट लाभाथ्यर्थ्यांना १०० टक्के अनुदानावर मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article