कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा 'अलर्ट मोड' वर

11:50 AM May 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर पोलीस दल अलर्टमोडवर आले आहे. जिह्याती मंदिरे, पर्यटनस्थळे, धरणे आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याच्या सुचना नुकत्याचा विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या आहेत. यानंतर जिह्यातील पर्यटनस्थळे, धरण आणि अंबाबाई मंदिर, विमानतळ येथील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. येथील सुरक्षेचा दररोज आढावा वरिष्ठ पातळीवरुन घेतला जात आहे.

Advertisement

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले करून दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्यानंतर दोन्हीकडून हवाई हल्ले सुरू असल्याने देशातील पोलिस दल अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील प्रत्येक राज्याच्या पोलीस महासंचालकांना सुचना दिल्या आहेत. यानुसार पोलीस महासंचालकांनी पोलिस महानिरीक्षकांची बैठक घेवून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहेत. यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी गुरुवारी परिक्षेत्रातील पोलीस अधिक्षकांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेवून महत्वाच्या सुचना दिल्या आहेत.

पोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वानपथक, गोपनीय विभाग, शीघ्रकृती दले, वाहने सज्ज ठेवण्याच्या सूचना सर्व पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. नियमित मॉक ड्रिल, सराव केले जात आहे. सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिह्यात या पूर्वी एनआयएच्या पथकाने छापेमारी केली आहे. पीएफआय या संघटनेशी संबंधीत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जवाहरनगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पुणे कोथरुड येथे सापडलेल्या दोन दहशवाद्यांकी आंबोलीच्या जंगलामध्ये बॉम्बची चाचणी केल्याचे तपासात समोर आले होते. या दोन दहशतवाद्यांनी पुणे येथून सातारा, कोल्हापूर, निपाणी मार्गे आंबोलीला गेल्याची माहिती समोर आली होती. यानुसार राज्याचे दहशतवाद विरोधी पथक कोल्हापूरात आले होते. यामुळे कोल्हापूरात काही स्लीपर सेल असण्याची शक्यता लक्षात घेवून पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

भारत-पाकमधील युद्धजन्य स्थितीत परिक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सायबर सेल विभागाच्या वतीने सोशल मिडीयावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. समाजामध्ये जातिय तेढ निर्माण करणारे तसेच धार्मिक भावना भडकवणाऱ्या मॅसेज ब्लॉक करुन संबंधीतांवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

1.अंबाबाई मंदिर

2.कोल्हापूर विमानतळ

3.राधानगरी धरण

4.राधानगरी जलविद्युत केंद्र

5.दूधगंगा काळम्मावाडी धरण

6.दुधगंगा जलविद्युत केंद्र

7.तिलारी धरण

8.तिलारी जलविद्युत केंद्र

9.चांदोली धरण व जलविद्युत केंद्र

करविर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ाचारही दरवाजांवर शिघ्र कृती दलाचे 4 जवान तैनात करण्यात आले आहेत. पुर्वी चार दरवाजांवर दोनच जवान आणि पोलीस होते. आता मात्र यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच डॉग स्कॉड आणि बॉम्बशोध पथकाच्या वतीने दिवसातून चार वेळा मंदिराची तपासणी केली जात आहे.

जिह्यातील सर्वच संवेदनशिल ठिकाणे धरण, मंदिरे आणि विमानतळांच्या सुरक्षेचा आढावा घेवून त्याचा दैनंदिन आढावा घेण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत. यानुसार या सर्व ठिकाणांची दररोज तपासणी घेवून आढावा घेतला जात आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article