For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुळस येथे १४ जानेवारीला जिल्हास्तरीय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा

04:17 PM Dec 10, 2023 IST | अनुजा कुडतरकर
तुळस येथे १४ जानेवारीला जिल्हास्तरीय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्या वतीने सलग दहाव्या वर्षी दि. १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता श्री शिवाजी हायस्कूल, तुळस (तुळस श्रीदेव जैतीराश्रित संस्थचे संस्थापक कै.रामभाऊ तुळसकर स्मृती सभागृह) येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर वक्तृत्व स्पर्धा शालेय मोठा व विशेष व लहान गट अशा एकूण तीन गटात तर पाठांतर स्पर्धा लहान गट ( इयत्ता २ री पर्यंत) व मोठा गट (इयत्ता ३री ते ४थी) अशा दोन गटात आयोजित केली आहे.

मुलांवरती लहान वयात संस्कार व्हावेत त्याचप्रमाणे त्यांच्यात पाठांतर कौशल्य विकसित व्हावे यासाठी पाठांतर स्पर्धा दोन गटात आयोजित केलेली असून इयत्ता दुसरी पर्यंतचा एक गट असून संस्कृत श्री गणपती स्तोत्र हा पाठांतरचा विषय आहे. तर , इयत्ता तिसरी ते चौथी या गटासाठी श्री मारुती स्तोत्र हा पाठांतराचा विषय आहे. पाठांतर स्पर्धेतील दोन्ही गटातील अनुक्रमे पाच विजेत्यांना भेटवस्तू, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.शालेय गटातील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता ७वी पर्यंत हा (लहान गट) असून यासाठी मोबाईल हटवा,बालपण वाचवा यावर विद्यार्थ्यांनी किमान ५ मिनिटे तर कमाल ६ मिनिटे आपले विचार व्यक्त करायचे आहेत.

Advertisement

वक्तृत्व स्पर्धेसाठी इयत्ता ८वी ते १० हा (मोठा) गट असून यासाठी कल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज हा विषय असून किमान ६ मिनटे तर कमाल ७ मिनिटे इतक्या वेळेत मराठी भाषेतून स्पर्धकांनी विचार मांडायचे आहेत तर या वक्तृत्व स्पर्धेत इंग्रजी माध्यमातील मुलांना व्यासपीठ देण्यासाठी इयत्ता १० वी पर्यंत या (विशेष गटासाठी) The Great Leader Chatrapati Shivaji Maharaj / 'दी ग्रेट लीडर शिवाजी छत्रपती महाराज' हा विषय असून विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून किमान ६ मिनिटे व कमाल ७ मिनीटे वेळेत विचार व्यक्त करायचे आहेत.

शालेय लहान गटासाठी अनुक्रमे ₹५५५, ₹४४४, ₹३३३ उत्तेजनार्थ १ व उत्तेजनार्थ २ साठी प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र तर शालेय मोठा आणि विशेष या दोन्ही गटासाठी अनुक्रमे ₹७७७, ₹५५५, ₹३३३ उत्तेजनार्थ १ व उत्तेजनार्थ २ साठी प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

सर्व स्पर्धकांनी शाळेचे शिफारस पत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे शालेय ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी गुरुदास तिरोडकर (९४२०७४७२६८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.