आडवलीत शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय खुली एकपात्री अभिनय स्पर्धा
04:44 PM Feb 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवण । प्रतिनिधी
Advertisement
मालवण तालुक्यातील आडवली येथील सनराईज शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने रात्री ठीक 9 वाजता जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . ही स्पर्धा खुल्या वयोगटासाठी असून स्पर्धेचा विषय हा शिवकालीन/ संतकालीन व्यक्तिरेखा-प्रसंग सादरीकरण हा आहे. विजेत्या पहिल्या 5 स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून स्पर्धेची नियमावली व नोंदणीसाठी मिलिंद चव्हाण- 9403229230/ 9322191369 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement