For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेत्ये येथे ३१ जानेवारीला जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा

02:13 PM Jan 18, 2026 IST | अनुजा कुडतरकर
वेत्ये येथे ३१ जानेवारीला जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा
Advertisement

न्हावेली/वार्ताहर

Advertisement

श्री कलेश्वर नाट्यमंडळ,वेत्ये वरची गावकरवाडी आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा शनिवार ३१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.त्यानिमित्त सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी १२ वाजता आरती १ वाजता महाप्रसाद, आणि संध्याकाळी ५.३० वाजता भजन स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. पुढीलप्रमाणे या स्पर्धेतील सहभागी संघ --- सायंकाळी ७ ते ७.४० वाजता गोठण प्रासादिक भजन,वजराट ( बुवा - सोमेश वेंगुर्लेकर) सायंकाळी ७.५० ते ८.३० वाजता सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ,कोंडुरा वेंगुर्ला ( बुवा - विवेक पेडणेकर) रात्री ८.४० ते ९.२० वाजता दत्त प्रासादिक भजन मंडळ,वर्दे ( बुवा - नरेंद्र मेस्री ) रात्री ९.३० ते १०.१० वाजता रामकृष्ण हरि सेवा संघ पाट पंचक्रोशी ( बुवा - आशिष सडेकर ) रात्री १०.२० ते ११ वाजता लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ,कणकवली ( बुवा - योगेश मेस्री ) रात्री ११.१० ते ११.५० वाजता सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळ,अणसूर ( बुवा - हर्षल मेस्री ) रात्री १२ ते १२.४० वाजता सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ,कणकवली ( बुवा - दुर्गेश मिठबावंकर ) रात्री १२.५० ते १.३० वाजता स्वराभिषेक प्रासादिक भजन मंडळ ( बुवा - गितेश कांबळी ) यांचा समावेश आहे.या स्पर्धेला प्रथम पारितोषिक ११ हजार १११ रुपये,द्वितीय पारितोषिक ७ हजार ७७७ रुपये,तृतीय पारितोषिक ५ हजार ५५५ रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक ३ हजार ३३३ रुपये तसेच उत्कृष्ट कोरस,गायक, झांज,हार्मोनियम,पखवाज,तबला यांना प्रत्येकी ५०० बक्षिसे ठेवण्यात आली आहे.भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कलेश्वर नाट्य मंडळ वेत्ये यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.