For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

24 डिसेंबरला सावंतवाडीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

02:53 PM Dec 22, 2023 IST | अनुजा कुडतरकर
24 डिसेंबरला सावंतवाडीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

रोटरी क्लब,सावंतवाडी आणि मुक्ताई ॲकेडमी यांच्या संयुक्त विदयमाने सावंतवाडीत विदयार्थी - विदयार्थिनींसाठी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धा 20 वर्षाखालील विदयार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे.स्पर्धेचे उदघाटन श्री.पंचम खेमराज महाविदयालयाच्या सभगृहात सकाळी 09.00 वाजता करण्यात येईल.स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रवेश फी रु.50 घेण्यात येईल.स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव,जन्मतारीख,ठीकाण आणि आधारकार्ड 9422054948 (श्री.आबा कशाळीकर) या मोबाईल क्रमांकावर वाॅट्स ॲपद्वारे शनिवार दि.23 डिसेंबर सायंकाळी 07.00 वाजेपर्यंत पाठवायचे आहे.राष्ट्रीय बुदधिबळ संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा खेळविण्यात येईल.पंचांचा निर्णय अंतिम राहील.

पुढील तीन गटात स्पर्धा खेळविण्यात येईल.
1] 20 वर्षाखालील खुला गट
1) रु.1,000, चषक, प्रशस्तीपत्र
2) रु.750, चषक, प्रशस्तीपत्र
3) रु.500, चषक, प्रशस्तीपत्र

Advertisement

2] 13 वर्षाखालील गट
1) रु.750, चषक, प्रशस्तीपत्र
2) रु.500, चषक, प्रशस्तीपत्र
3) रु.250, चषक, प्रशस्तीपत्र

3] 9 वर्षाखालील गट
1) रु.750, चषक, प्रशस्तीपत्र
2) रु.500, चषक, प्रशस्तीपत्र
3) रु.250, चषक, प्रशस्तीपत्र

Advertisement
Tags :

.