For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्हावेलीत २८ मार्चला जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

11:56 AM Mar 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
न्हावेलीत २८ मार्चला जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

कै.बुवा भूषण उदय पार्सेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वरभूषण मित्रमंडळ,न्हावेली पार्सेकरवाडी येथे शनिवार २८ मार्च रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ६.वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे.स्पर्धेत भाग घेतलेले संघ असे - सायंकाळी ६ वाजता श्री देव कालिका प्रासादिक भजन मंडळ,कारिवडे ( बुवा - सुदिप गावडे ) सायंकाळी ७ वाजता श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ, सातुळी ( बुवा- अमित परब ) रात्री ८ वाजता श्री देव समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ,मळगाव ( बुवा - गौरांग राऊळ ) रात्री ९ वाजता चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ,सुरंगपाणी वेंगुर्ला ( बुवा - अनिकेत भगत ) रात्री १० वाजता नवतरुण युवक भजन मंडळ,माणगाव ( बुवा - ओकांर कुंभार ) रात्री ११ वाजता श्री देव इसोटी प्रासादिक भजन मंडळ,मातोंड ( बुवा - सचिन सावंत ) रात्री १२ वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ( बुवा - प्रसाद आमडोसकर ) रात्री १ वाजता सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळ, अणसूर वेंगुर्ला ( बुवा हर्षल मेस्री ) यांचा समावेश आहे.प्रथम पारितोषिक १११११रुपये,द्वितीय पारितोषिक ७७७७ रुपये,तृतीय पारितोषिक ५५५५ रुपये,तसेच उत्कृष्ट गायक १००१ रुपये,प्रमाणपत्र व चषक ,उत्कृष्ट पखवाज १००१ रुपये प्रमाणपत्र व चषक उत्कृष्ट हार्मोनियम १००१ रुपये,प्रमाणपत्र व चषक उत्कृष्ट झांज १००१ रुपये,प्रमाणपत्र व चषक उत्कृष्ट कोरस १००१ रुपये प्रमाणपत्र व चषक,उत्कृष्ट तबला १००१ रुपये प्रमाणपत्र व चषक ठेवण्यात आली आहे.लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.