For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : बेलववळे बुद्रुक येथे जिल्हा लोक कलाकार संघटनेचा मेळावा उत्साहात

01:58 PM Dec 26, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   बेलववळे बुद्रुक येथे जिल्हा लोक कलाकार संघटनेचा मेळावा उत्साहात
Advertisement

                                 बेलवळे बुद्रुक येथे लोककलेचा जागर

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघटनेच्यावतीने तेराव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील लोक कलाकारांचा मेळावा संपन्न झाला. हा मेळावा बेलवळे बुद्रुक ता. कागल येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मेळाव्याला जिल्ह्यातील हजारोहून अधिक लोक कलाकारांनी सहभाग घेतला होता.

प्रारंभी गावातून कलाकारांनी जागृती दिंडी काढली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व समाधान कांबळे यांनी सादर केलेल्या गणाने झाली. स्वागत प्रास्ताविक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले. यावेळी नाथाजी पाटील यांनी लोक कलाकारांनी समाजामध्ये निर्माण होत असलेल्या विकृत समस्यांची जाणीव जागृती लोककलेच्या माध्यमातून करावी.

Advertisement

चंदगड, आजरा, शाहुवाडी, गगनबावडा, राधानगरी या दुर्गम तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील कलाकारांनी वासुदेव, गोंधळी, जोगवा, भजन, गण, गवळण, लावणी, शाहिरी, गौरी गीत, धनगरी नृत्य यासह अन्य प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या.

या मेळाव्यास संगीतकार महेश हिरेमठ, डॉ. अनंत गिरी, शाहीर धोंडीराम मगदूम, ढोलकी सम्राट सुरेश कांडगावकर, अनिता मगदूम, तमाशगीर शंकर डावाळे, पांडू आवळकर, मानधन कमिटीचे सर्व सदस्य, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन गीता खोत यांनी केले. आभार विलास पाटोळे यांनी मानले.

Advertisement
Tags :

.