For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुना पी. बी. रस्त्याचे काम केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान

10:55 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
जुना पी  बी  रस्त्याचे काम केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान
Advertisement

बेळगाव : जुने बेळगाव ते जुन्या पी. बी. रोडवरील अलारवाड अंडरब्रिज सर्कलपर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले होते. यामुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. परिणामी अपघातही होत होते. रस्ता नूतनीकरण करण्याची मागणी वकील, शेतकरी व ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलत रस्त्यावर पॅचवर्क करण्यात आल्याने वकील, शेतकरी व नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

या मार्गावरून हलगा, बस्तवाड, अलारवाड, मास्तमर्डी, तारिहाळ, कोंडुसकोप्प, के. के. कोप्प, कोळीकोप्प, खामकारहट्टी येथील नागरिक व वकील शहराकडे येत असतात. या भागातील शेतकरी शेतीमालासह बाजारपेठेत येत येतात. तर विविध कामांसाठी नागरिकांची वारंवार शहराकडे ये-जा असते. तसेच मोठ्या प्रमाणात वकीलही आपल्या दैनंदिन कामकाजासाठी येतात. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. मात्र या पावसाळ्यात या रस्त्याची वाताहात झाली होते. या मार्गावरून प्रवास करणे कठीण बनले होते.

अलारवाड अंडरब्रिज सर्कलपर्यंतच्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. तसेच काहीवेळा किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. परिणामी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने लवकरात लवकर रस्त्याची दुरुती करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र जिल्हा प्रशासनाने सजग राहून याची गांभीर्याने दखल घेतली. यासाठी निधीची तरदूत करून रस्त्यावर पॅचवर्क करण्यात आले. रस्त्याचे काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.